Tarun Bharat

वाळपईत बांगलादेशी घुसखोरास अटक

Advertisements

नागवे भंगार अड्डय़ावरील छाप्यात बिलालच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी / वाळपई

डिचोली येथील बोर्डे याठिकाणी मंगळवारी पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक केल्यानंतर या घुसखोरीचे कनेक्शन सत्तरीतील ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे काल बुधवारी उघड झाले. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वाळपई-नागवे येथे एका बांगलादेशी तरूणाला अटक केली आहे. यामुळे सत्तरीत बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. नागवे येथील भंगार अड्डय़ावर काम करणाऱया 30 वर्षीय बिलाल अन्वर आखोन याला एटीएसने अटक केले आहे.

 नागवे येथे बांगलादेशी घुसखोर राहत असून यासंदर्भात स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एटीएसने धाडसी कारवाई करत या तरुणाला शोधून काढून अटक केली. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सत्तरीतील इतर गावांमध्येदेखील बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया लोकांत व्यक्त केली जात आहे.

 नागवे भंगार अड्डय़ावर छापा

 मंगळवारी दहशतवाद विरोधी पथकाने एकूण चार बांगलादेशी घुसखोरांना डिचोली या ठिकाणी छापा मारुन ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सत्तरीत आणखी काही घुसखोर राहत असल्याचे समजले. या माहितीवरून एटीएसने बुधवारी सकाळी नागवे येथे भ्ंागार अड्डयावर छापा मारुन बिलाल अन्वर आखोन याला ताब्यात घेतले. ज्यावेळी हा छापा मारण्यात आला, त्यावेळी बिलाल हा  भंगार अड्डय़ात काम करत होता. सखोल चौकशी केल्यानंतर त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समजल्याने त्याला अटक करण्यात आली. अधिक तपास सुरू असून आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.

 बिलालचे बारा वर्षांपासून वास्तव्य

 अटक केलेला बिलाल अन्वर आखोन हा नागवे येथील भंगार अड्डय़ावर 12 वर्षापासून काम करत होता. तो वाळपईत भंगार गोळा करण्याचे काम करीत असे. त्याचे पॅनकार्ड, मतदानकार्ड बंगळुरू येथील असून तो चौथीपर्यंत शिकलेला आहे.   तो बारा वर्षांपूर्वी गोव्यामध्ये आला असून वाळपई येथे राहत आहे. त्याने लग्न केले असून एक मुलगा आहे.

 बांगलादेशींनी घेतलेत भूखंड

सत्तरातील म्हाउढस पंचायत क्षेत्रातील अनेक भूखंड बांगलादेशी घुसखोर व बिगरगोमंतकीयांकडून खरेदी केले जात आहेत. अनेक बेकायदेशीर घरे उभी राहत असून पंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे.

होंडा, भिरेंडा भागात विशेष तपासाची गरज

अटक केलेला बिलाल हा नागवे येथे 12 वर्षे राहत होता. मात्र स्थानिक पोलिसांना याचा थांगपत्ता लागला नाही याबाबत ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. होंडा व भिरोंडा पंचायतक्षेत्रात बिगरगोमंतिकीयाचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला असून या ठिकाणी पोलिसांनी विशेष तपास करणे गरजेचे आहे. सत्तरीत असलेल्या बांगलादेशी खुसखोरांना पोलिसांनी हाकलून लावावे अशी मागणी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

बांगलादेशी घुसखोरांचा ‘गॉड’ फादर बिलाल

अटक केलेला बिलाल अन्वर आखोन हा बांगलादेशी घुसखोरांना सत्तरीत वेगवेगळय़ा ठिकाणी आश्रय देत असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत त्याने अशा अनेक बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिला असून पोलिसांच्या बचावापासूनही तो या घुसखोरांना मदत करीत असल्याची माहिती उघड झाली आहे. बिलाल अन्वर आखोन याचा गुह्यांशी संबंध असण्याचा संशय व्यक्त होत आहे.

बेकायदेशीर घरांचा फायदा घुसखोरांना

सत्तरीतील नागवे गावात अनेक बिगरगोमंतकीय राहत असून हा गाव अत्यंत धोकादायक बनलेला आहे. अनेकवेळा गावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. स्थानिक पोलिसांनी याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या गावात बेकायदेशीर घरे उभारण्यात आली आहेत. या घरांचा फायदा बांगलादेशी घुसखोर घेत असून यामुळे आगामी काळात गावातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्मयता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

उमेदवारीच्या स्वयंघोषणेचा अधिकार कुणालाच नाही

Amit Kulkarni

भटवाडी कोरगाव येथे सापडला रशियन नागरिकाचा मृतदेह

Amit Kulkarni

बाद फेरीच्या प्रवेशासाठी प्रखर स्पर्धा; आज गोवा-नॉर्थईस्ट लढत

Amit Kulkarni

विधानसभा अधिवेशनासंदर्भात ‘आप’च्या बैठकीत चर्चा

Amit Kulkarni

गोव्यात साडेदहा लाख बुस्टर डोस देणार

Amit Kulkarni

अमित शहा 30 रोजी प्रचारासाठी गोव्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!