Tarun Bharat

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश

सुनील महाराजांचा शिवसेना प्रवेश संजय राठोडासांठी धोक्याची घंटा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी आज शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. सुनील महाराज यांनी शुक्रवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले. सुनील महाराज यांचा शिवसेना पक्षातील प्रवेश हा यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातील राजकारण कायमचे बदलणारा ठरू शकतो. दिग्रस मतदारसंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून जाणाऱ्या संजय राठोड यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील महाराजांना शिवसेनेत आणून संजय राठोड यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे. कारण, आजपर्यंत दिग्रस मतदारसंघातील बंजारा मते एकगठ्ठा संजय राठोड यांना मिळत होती. यामध्ये तेथील पोहरादेवी येथील महंतांची भूमिका निर्णायक ठरत होती. बंजारा समाजावर या महंतांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दिग्रस मतदारसंघातून संजय राठोड यांच्याविरोधात महंत सुनील महाराज यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर,”जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”

Related Stories

साताऱ्यात आज ४८ डिस्चार्ज तर ५२३ नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

भीमाशंकरजवळील पोखरी घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

datta jadhav

राजेश क्षीरसागर यांचे पोष्टर फाडले, रवी इंगवले यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल

Rahul Gadkar

विरोधकांचे तोंड म्हणजे गटार- संजय राऊत

Archana Banage

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते आर्थिक संकट उभे ठाकले आहे – खा. शरद पवार

Archana Banage

सिरमने जाहीर केली कोरोनावरील लसीची किंमत; बनवणार 10 कोटी डोस

datta jadhav
error: Content is protected !!