जिल्हा पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
प्रतिनिधी / बेळगाव
चोऱया, घरफोडय़ा, दरोडे, लुटमारींच्या घटनांपाठोपाठ आता गुन्हेगारांनी ग्रामीण भागातील बँकांना आपले लक्ष्य बनविले आहे. कित्तूर व खानापूर तालुक्मयातील दोन बँका फोडण्याचा प्रयत्न झाला असून त्यामुळे जिल्हा पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
कित्तूर तालुक्मयातील आंबडगट्टी येथील कर्नाटक विकास ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून स्ट्रॉंगरुममध्ये गुन्हेगारांनी प्रवेश करताच सायरन वाजल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. कित्तूर पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी, कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेट व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हेगारांचा माग काढण्यात येत आहे.
अशीच घटना खानापूर तालुक्मयातील जांबोटीतही घडली आहे. केव्हीजी बँक फोडण्याचा प्रयत्न झाला असून सायरन वाजल्यामुळे गुन्हेगारांनी तेथून पलायन केले. खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दोन्ही ठिकाणी कर्नाटक ग्रामीण विकास बँकेला लक्ष्य बनविण्यात आले आहे.
कित्तूर व खानापूर तालुक्मयात घडलेल्या या दोन घटनांमुळे एकच खळबळ माजली आहे.
गुन्हेगारांनी ग्रामीण भागांतील बँकांना आपले लक्ष्य बनविले असून ही टोळी स्थानिक आहे की बेळगाव बाहेरची याचा तपास करण्यात येत आहे.