Tarun Bharat

नव वर्षाच्या शुभेच्छा देताना “तुका म्हणे” शब्दाचा वापर करण्यास बंदी !

बेळगांव : सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना “तुका म्हणे” चा सध्या चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. . मात्र आता शुभेच्छा देताना तुका म्हणे या शब्दांचा वापर केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देहू संस्थांनाकडून देण्यात आली आहे. जुन्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना सोशल मीडियावर तुका म्हणे असा शब्दप्रयोग वापर करून मेसेज व्हायरल केले जातात. दरवर्षी अशा आशयाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांचा अपमान केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देहू संस्थानांकडून देण्यात आला आहे.

संतांच्या अभंगांची मोड करून शुभेच्छा दिल्या जातात. तेव्हा त्यांच्या अभंगांचा किंवा त्यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर विडंबन करणाऱ्या पोस्ट व्हायरल करू नये अन्यथा देहू संस्थान मार्फत करत कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. देशातील कुठल्याही महापुरुषांच्या नावाने विडंबन खपवून घेणार नाही असा इशारा देहू संस्थांनाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.

Related Stories

अच्युत पालव यांच्या अक्षरचित्रांचं प्रदर्शन 21 जानेवारी पासून

prashant_c

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन व सांगता मुख्य मंदिरातच

Tousif Mujawar

क्यूबामध्ये खेकडय़ांचा कहर

Patil_p

फ्लिपकार्ट विकणार ताजी भाजी अन् फळे

prashant_c

एकाच वेळी नऊ महिलांशी विवाह

Patil_p

भारतीय वायुदलाचा 88 वा स्थापना दिवस : अभिमानास्पद गगनभरारी

Tousif Mujawar