Tarun Bharat

बाप्पा पावला : शेतकऱयांसाठी 3501 कोटी नुकसानीची घोषणा

Advertisements

मुंबई  

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी  शेतकऱयांना बाप्पा पावला असून राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवफष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार  आहे.

  जुन ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱयांना अतिवफष्टीचा फटका बसला आहे. आपदग्रस्त शेतकऱयांना मंजूर मदत तातडीने वितरीत  करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये, बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रुपयांवरन 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये करण्यात आला आहे. जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

 शेतकऱयांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱयांकडे  वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱयांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याबाबतचा शासननिर्णय मदत व पुनर्वसन विभागाने 8 सप्टेंबर  2022  रोजी निर्गमित केला.

Related Stories

हिंसाचार थांबल्याशिवाय सुनावणी नाही

Patil_p

उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा नंतर आढळले कप्पा विषाणूचे रुग्ण!

Tousif Mujawar

“माझ्यापेक्षा कॉंग्रेस पक्षाला खरी गरज ‘याची’ आहे…” : प्रशांत किशोर

Archana Banage

‘रेमडेसिवीर’चे उत्पादन होणार दुप्पट

datta jadhav

शिअदसोबत भाजप करणार नाही आघाडी

Patil_p

पेगासस संदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी

datta jadhav
error: Content is protected !!