Tarun Bharat

मुंबईत बाप्पांची जल्लोषात मिरवणूक

मुंबईकरांनी दोन वर्षांनी अनुभवला ‘बाप्पा मोरया’चा गजर लालबागच्या रस्त्यांवर जनसागराला उधाण

मुंबई/ प्रतिनिधी

मागील दोन वर्षे कोरोनाच्या धास्तीने साध्या स्वरूपात साजरा झालेल्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकाना पारखे झालेल्या मुंबईकरांनी आज  वाद्यांच्या दणदणाटात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात निघालेल्या मिरवणुका पहिल्या आणि त्यांचे कान आणि मन तफप्त झाले. गणेश विसर्जन मिरवणुकांच्या दणदणाटाने आणि अथांग जनसागराच्या रेटय़ाने रेंगाळणारा कोरोनाही पळून जाईल अशी खात्री व्यक्त होत आहे.

चौपाटय़ांवर जनसागर

दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. मुंबईच्या गणेश विसर्जन मिरवणुकांना जागतिक ओळख आहे. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतातच, पण देश-परदेशातूनही लोक येतात. त्यामुळे चौपाटय़ांवर जनसागराच उसळतो. तशीच गर्दी आज लालबागच्या रस्त्यांवर आणि चौपाटय़ांवर झाली होती.मुंबईतील ठिकठिकाणच्या मानाच्या गणपतींचे विसर्जन सकाळपासून सुरू झाले आणि अवघी मुंबापुरी गणेशाच्या गजराने दुमदुमली.

लालबाग परिसरात अलोट गर्दी

लालबागचा राजा, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शन या गणपतीला निरोप देण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच लालबाग परिसरात अलोट गर्दी केली. फटाक्यांची आतशबाजी, गुलालाची उधळण आणि ढोलल्ल्ताशाच्या गजरात मिरवणुका मार्गस्थ होऊ लागल्या, तसतशी भाविकांची गर्दी होऊ लागली.

सुरुवातीला गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर  लालबागच्या राजाची मिरवणूक बाहेर पडली. लालबागच्या राजाचा रथ खेचण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. ज्यांना रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य होत नाही, ते विसर्जन मिरवणुकीत लालबागच्या राजाचे मनोहारी रूप डोळ्यांत साठवून घेतात. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईसह अन्य शहरांतूनही भाविक आले आहेत. लालबाग, परळ आदी गिरणगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक सुरू होताच  गिरगाव, खेतवाडीसह गिरगावच्या मंडळांची विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झाली.  गिरगावातील मानाचे गणपती अशी ओळख असलेले  गिरगावचा राजा आणि मुगभाटमधील गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर रस्त्यातील जनसागर सिंधुसागराकडे वळू लागला आणि चौपाटय़ांवर जनसागराचे उधाण आले.

मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज

गणपती बाप्पांच्या दहा दिवसांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व विसर्जन स्थळांच्या ठिकाणी विविध सेवा -सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 73 नैसर्गिक आणि 162 कृत्रिम विसर्जन स्थळांवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. गिरगांव चौपाटी येथून विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त, गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली.

चौपाटय़ांच्या ठिकाणी किनार्यांवर 460 जाड लोखंडी प्लेट्सची मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. छोटय़ा गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था, 786 जीवरक्षकांसह 45 मोटर बोटींचीही व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांनी अर्पण केलेले हार, फुले याचे निर्माल्य जमा करण्यासाठी 357 निर्माल्य कलशांसह निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर व डंपर या वाहनांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे 10 हजार पालिका कर्मचारी तैनात केले आहेत.

Related Stories

16 मे नंतर भारतात कोरोनाचा नवा रुग्ण नाही, नीती आयोगाच्या सदस्याचा दावा

prashant_c

राज्यसभा निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट

Patil_p

रेल्वे विभागाकडून राज्यांसाठी 64 हजार बेडसह 4 हजार कोविड केअर कोचची निर्मिती

Archana Banage

उत्तरप्रदेशच्या 600 गावांमध्ये पूरसंकट, लोकांचे हाल

Amit Kulkarni

पंजाबमध्ये 554 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

महाराष्ट्र : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar