Tarun Bharat

Solapur; बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या अध्यक्षपदी ऍड. मिलिंद थोबडे यांची दुसऱ्यांदा निवड

Advertisements

प्रतिनिधी / सोलापूर

जेष्ठ विधिज्ञ अॅड. मिलिंद थोबडे यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी दुसऱयांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या मुंबई येथील कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व सदस्यीय बैठकीमध्ये बार कौन्सिलचे विद्यमान सदस्य अॅड. मिलिंद थोबडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

अॅड. मिलिंद थोबडे यांनी सन 1983 मध्ये आय. एल. एस. विधी महाविद्यालय पुणे येथून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांचे वडील तथा सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. काकासाहेब थोबडे यांच्याकडे वकिली व्यवसायास सुरुवात केली व कायद्याचे प्रशिक्षण घेतले. अॅड. मिलिंद थोबडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक नावाजलेले फौजदारी खटले चालवून विधीक्षेत्रात यशस्वीपणे सुप्रसिद्ध वकील म्हणून मानाचे स्थान प्राप्त केले आहे. सन 2005 मध्ये अॅड. थोबडे यांनी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले. विधीक्षेत्रात काम करत असताना वकिलांना दैनंदिन व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेऊन अॅड. थोबडे यांनी सन 2010 मध्ये बार कौन्सिलची निवडणूक लढविण्याचे ठरवून निवडणूक लढविली व महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये ऐतिहासिक सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते मिळवून बार कौन्सिल सदस्य म्हणून निवडून आले. अॅड. थोबडे यांचे वकीलांकरीता केलेल्या कार्याची दखल घेत सन 2011 मध्ये त्यांची बार कौन्सिलचे अध्यक्षपदी प्रथमतः बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यानंतर अॅड. मिलिंद थोबडे हे सन 2019 मध्ये बार कौन्सिलचे सदस्यपदी पुनशः बहुमताने निवडून आले. अॅड. मिलिंद थोबडे यांच्या कार्याचा गौरव करून बार कौन्सिलचे सर्व सदस्यांनी एकमताने महाराष्ट्र व गोवा राज्यातील जवळजवळ अडीच लाख वकिलांचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना दुसऱ्यांदा संधी देत मुंबई येथे बार कौन्सिलच्या अॅड. राजेंद्र उमाप यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Related Stories

वेलसांव किनाऱयावरील खून प्रकरणाचा छडा लावण्यात यश

Patil_p

येत्या पाच वर्षांत सांगेवासियांच्या सर्व समस्या सुटतील

Patil_p

कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणार

Patil_p

मित्रानेच जाळली मित्राची मोटार सायकल

Patil_p

गोकुळ, जिल्हा बँक संचालक मंडळास 3 महिन्यांची मुदतवाढ

Abhijeet Shinde

गणेश मूर्तीच्या कलेमध्ये आनंद शोधणारा ज्येष्ठ कलाकार बुधाजी गावकर

Omkar B
error: Content is protected !!