वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पेनमध्ये सुरू असलेल्या ला लिगा फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात बलाढय़ बार्सिलोनाला स्थानिक इस्पेनॉलने बरोबरीत रोखले होते. हा सामना बरोबरीत राहिल्याने बार्सिलोना फुटबॉल क्लबने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे.
या स्पर्धेत यापूर्वी रियल माद्रिद संघाने रियल व्हॅलेडोलीडचा 2-0 असा पराभव करत आघाडीचे स्थान मिळवले होते. बार्सिलोना आणि इस्पेनॉल यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. बर्सिलोनातर्फे सातव्या मिनिटाला मार्कोस ऍलेन्सोने खाते उघडले. 73 व्या मिनिटाला जोसेलुने इस्पेनॉलला बरोबरी साधून दिली. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता बार्सिलोनाने 38 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले असून त्यांनी 15 पैकी 12 सामने जिंकले असून दोन सामने बरोबरीत तर एक सामना गमावला आहे. रियल माद्रिदचा संघ गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर आहे.