जेएमएफसी न्यायालयात पार्किंग समस्या गंभीर
प्रतिनिधी /बेळगाव
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या न्यायालयाच्या आवारात पार्किंगला शिस्त नाही. जागेचा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. चार चाकी वाहनांची संख्या वाढल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे बुधवारी जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच बॅरिकेड्स लावून चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता.
न्यायालय आवारात आणखी एक न्यायालयीन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या जटील बनली आहे. घाईगडबडीत सारेजण दुचाकी बेशिस्तपणे पार्क करून जात आहेत. पाऊस सुरू असल्यामुळे चार चाकी वाहनांतून येणारे वकील व पक्षकारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भररस्त्यातच आणि जेएमएफसी न्यायालय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच पार्किंग करण्यात येत आहे. बार असोसिएशनने त्यामुळे प्रवेशद्वारासमोरच बॅरिकेड्स उभारले आहेत.
न्ययालय आवारात दोन्ही बाजूला पार्किंग असल्यामुळे ये-जा करणेही कठीण बनले आहे. तेव्हा याकडे बार असोसिएशनने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. त्या ठिकाणी रखवालदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आवार मोठा असल्याने एका रखवालदाराला सर्व ठिकाणी लक्ष देणे अशक्मय आहे. जिल्हा न्यायालयातून जेएमएफसी न्यायालयाकडे वारंवार यावे लागते. मात्र, धावपळ करण्याच्या या ठिकाणी म्हणजे प्रवेशद्वारासमोरच दुचाकी पार्क केल्या जातात. ये-जा करण्यासाठीही वाट नसते. त्यामुळे वकील वर्गाबरोबरच पक्षकारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एक तर जेएमएफसीच्या आवारात इमारतींची उभारणी केली जात आहे. त्यामुळे पार्किंगला जागा कमी पडत आहे. त्यामुळे जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच चार चाकी आणि दुचाकी पार्क केल्या जात आहेत. परिणामी याचा फटका साऱयांनाच बसत आहे. पोलिसांची वाहने, न्यायाधीश आल्यानंतर प्रवेशद्वाराजवळच वाहने लावली जातात. त्यामुळे बऱयाच वेळा ये-जा करण्यासाठी वाट शिल्लक राहत नाही. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यामुळे आता प्रवेशद्वारावरच बॅरिकेड्स उभारून चार चाकी वाहनांवर निर्बंध घालण्यात येत होते.