Tarun Bharat

बस्तवाड ह. येथे पावसामुळे घर कोसळले

Advertisements

वार्ताहर /हलगा

गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नेताजी गल्ली बस्तवाड ह. येथील मंगल कृष्णा काकतकर यांचे घर कोसळून मोठय़ा प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. घराचे छत कोसळून खाली आले आहे सदर घटना पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

 या घटनेमध्ये काकतकर कुटुंबियांच्या घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना मोठा मानसिक धक्काच बसला आहे यामध्ये खुर्ची, टेबल, जीवनावश्यक साहित्य तसेच धान्यांचे देखील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना आधार म्हणून गावातील ग्रामपंचायतीने व प्रशासनाने पुढाकार घेऊन या सर्व बाबींचा पाठपुरावा करून त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱयांकडून करण्यात येत आहे.

  पावसाचा जोर सर्वत्र ठिकाणी सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच जुन्या घरांची पडझड सर्वत्र ठिकाणी सुरू आहे तरी अशा कुटुंबांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी मागणी होत आहे.

काकतकर कुटुंबाचे राहण्याचे छत कोसळल्याने आता त्यांना राहायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिक व ग्रा. पं सदस्य, तलाठी आदींनी येऊन पाहणी केली आहे व त्यांना लवकरात लवकर मदत केली जाईल असे आश्वासन देखील देण्यात आले आहे.

Related Stories

अखेर महिन्याभरानंतर वकिलांचे कामबंद मागे

Patil_p

कोल्हापूर : माथेफिरुकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक

Abhijeet Shinde

बसुर्ते शिवारात धोकादायक ट्रान्स्फॉर्मर

Amit Kulkarni

येळ्ळूर ग्रा.पं.पोटनिवडणूक : पाच अर्ज दाखल

Amit Kulkarni

ड्रेनेजचे पाणी शिरून एटीएम मशीनचे नुकसान

Amit Kulkarni

तब्बल आठ किलो चांदीची चोरी..!

Nilkanth Sonar
error: Content is protected !!