Tarun Bharat

बावशी येथे राहते घर कोसळले

घरातील तिन्ही व्यक्ती सुरक्षित

कणकवली /प्रतिनिधी-

काल रात्रीपासून तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बावशी येथील सत्यवान मर्ये यांचे राहते घर कोसळले. त्यांचे दोन लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या धुवांधार पावसामुळे कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.


दरम्यान श्री मर्ये यांच्या घरात तीन व्यक्ती होत्या. त्यांना लगतच्या घरात स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.


शुक्रवारी रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जाणवली नदीचे पाणी वरवडे फणसनगर भागात रस्त्यावर आल्याने आचरा मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.

Related Stories

वायंगणतड येथील हानीची अधिकाऱयांकडून पाहणी

NIKHIL_N

गवारेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील वृद्ध जागीच ठार

Anuja Kudatarkar

रत्नागिरीत आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता

Patil_p

मोती तलाव कठड्यासंदर्भात राष्ट्रवादीचा सार्वजनिक बांधकामला घेराव

Anuja Kudatarkar

निडलवाडी पडली वेशीबाहेर !

Anuja Kudatarkar

‘इडा पिडा टळो…बळीचे राज्य येवो’ आळवणीने देवदिपावलीचा जागर

Archana Banage