प्रतिनिधी/ सांखळी
बाये सुर्ला येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरातील वार्षिक होमकुंड उत्सव यंदा रविवारी दि. 9 एप्रिल रोजी मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे. या निमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी, संध्याकाळी 6 वाजता. कळस पूजन, नंतर भजन आणि रात्री 10वा. कोकणी नाटक होणार आहे.
बाये येथील लहान मुलांनी (भाविक) पेडत्या निखाऱ्यावरून होमकुंडात प्रवेश करताना पाहण्यासाठी गोव्यातील अनेक लोक उपस्थिती लावतात. गेल्या काही वर्षापूर्वी गावांतील लहान मुलांनी एक खेळ म्हणून सुरू केलेला हा उत्सव आजही यशस्वी रित्या साजरा होत आहे. गोव्यातील सर्वात लहान होमकुंड उत्सव म्हणून ही याकडे पाहिले जाते. नागेश महादेव बायेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव लक्ष्मी नारायण मंदिर उत्सव समितीच्या मार्गदर्शन खाली साजरा केला जात आहे.
संपूर्ण गोव्यात बहुतेक गावात मोठ्या प्रमाणात होमकुंड उत्सव साजरा होताना पाहायला मिळतो. त्यात सर्वात मोठा होमकुंड हा शिरगाव येथील श्री लइराई देवीचा तर सर्वात लहान होमकुंड उत्सव म्हणून बाये सुर्ल येथील लक्ष्मी नारायण मंदिरातील उत्सवाकडे पाहिले जात आहे.