Tarun Bharat

हिंदू राष्ट्र स्थापण्यासाठी कृतीशील व्हा!

राष्ट्रीय मार्गदर्शन डॉ.चारुदत्त पिंगळे यांचे आवाहन : अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे उद्घाटन

प्रतिनिधी /फोंडा

 सध्या देशभरात चाललेला हिंसाचार पाहता, देशाची संपूर्ण शासनव्यवस्था हिंदू हिताची होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी कायम लढा द्यावा लागेल. हिंदूनी हिंदू राष्ट्राची मागणी करणे हा आमचा नैसर्गीक आणि घटनात्मक अधिकार आहे. त्यासाठी येणाऱया काळात वैचारिक आणि बौद्धिक स्तरावर सातत्याने लढावे लागेल. त्यादृष्टीने  अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन महत्वपूर्ण आहे. कालमहिम्यानुसार येत्या वर्ष 2025 मध्ये हिंदू राष्ट्र स्थापन होणार असून त्यासाठी हिंदूंना आत्तापासूनच कृतीशील व्हावे लागेल असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

 रामनाथी-फोंडा येथे रविवारपासून सुरु झालेल्या दहाव्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशविदेशातून तसेच भारतातील विविध राज्यातून 225 हून अधिक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.

 देशात हिंदूविरोधी मोठी आघाडी

 वाराणसी येथील ज्ञानवापी मशिद खटला, कर्नाटकातील हिजाब प्रकरण या मुद्दय़ांचे विश्लेषण करीत, सध्या भारतात कार्यरत हिंदू विरोधी अलायन्सच्या मागे राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप त्यांनी केला. हा अजेंडा हिंदू राष्ट्रासमोरील सर्वांत मोठे आव्हान असून त्याला वैचारिक व बौद्धिक पातळीवर विरोध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी हिंदू जनजागृती समिती पुरस्कृत ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण-हलाल जिहाद’ या मराठी व हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हिंदू फ्रन्ट फॉर जस्टीसचे संरक्षक तथा सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. हरिशंकर जैन, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी संयुक्तानंद महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निगुर्णानंदगिरी महाराज हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करुन व वेदमंत्रांच्या पठणाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सनातनचे धर्मप्रचारक सत्यवान कदम यांनी केले. श्रीराम जन्म भूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी हिंदू राष्ट्र स्थापनेचा संकल्प काही वर्षात पूर्ण हा दृकश्राव्य माध्यमातील संदेश प्रक्षेपित करण्यात आला.

गोव्यातील मंदिरातर्फे जैन पिता-पुत्राचा सन्मान

दुपारच्या सत्रात काशी विश्वनाथ मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला लढविणारे ऍड. हरिशंकर जैन आणि हिंदू फ्रन्ट फॉर जस्टीसचे राष्ट्रीय प्रवक्ते ऍड. विष्णूशंकर जैन यांचा गोव्यातील विविध देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. श्री मंगेश देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अजय कंटक व सचिव अरुण नाडकर्णी, कोरगाव-पेडणे येथील श्री कमळेश्वर मंदिरचे अध्यक्ष गुरुनाथ प्रभू, सचिव कृष्ण गावडे, जांभावली येथील रामनाथ दामोदर मंदिरचे खजिनदार जयेश कामत बांबोळकर, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ भाई पंडित, सचिव जयेश थळी हे उपस्थित होते.

 काशी येथील विश्वनाथ मंदिरात श्री मंगेश देवस्थानच्या महाजनांना पुजेचा पहिला मान आहे. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री उत्सवाच्या वेळी काशीच्या विश्वनाथ मंदिरातून गोव्यातील मंगेश देवस्थानात गंगाजल पाठविण्यात येते. या जलाद्वारे महाशिवरात्रीनंतर देवस्थानच्या गर्भगृहाची शुद्धी केली जाते, अशी माहिती कंटक यांनी दिली.

Related Stories

महाराष्ट्र चेकनाके खुले करण्यासाठी सिमा भागात सातार्डा येथे आंदोलन

Patil_p

ड्रग्स माफिया-भाजपा नेत्यांचे संबंध उघड

Omkar B

पालिका कायदा दुरुस्ती वटहुकूम अखेर मागे

Patil_p

बैठकीत जयेश साळगावकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पिळर्ण, वेरे, नेरूल भागात 6 दिवसानंतर पाणी पुरवठा सुरळीत

Amit Kulkarni

रस्ता रूंदीकरणाला कुस्मणवासियांचा विरोध

Amit Kulkarni

सीमेवर कोविड नेगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती कराच

Patil_p