ऑनलाईन टीम/तरुण भारत
अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळूण प्या असे सल्ले देतात. आपणा सर्वांना या उपायाबद्द्ल चांगलेच माहित आहे. पण याने नुकसानही होते हे अनेकांना माहिती नसतं. जर तुम्ही जास्त लिंबू पाणी सेवन केल्यास त्याचे अनेक साइड इफेक्ट्सही होतात.
कडक उन्हाळ्यात अनेकांना बाहेरून आल्यावर थकवा जाणवतो. यावेळी आपण उन्हापासून बचाव करण्यासाठी लिंबूपाणी पितो. लिंबू पाणी प्यायल्याबरोबर आपल्याला ताजेतवाने वाटते. पण तुम्हाला माहित आहे का, जास्त लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते? काहीही जास्त प्रमाणात घेतले गेले तर ते समस्या निर्माण करू शकते. त्यामुळं, जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.
लिंबू पाणी आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी रोज कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पितात. तसेच लोकांना उन्हाळ्यात ताजेतवाने वाटण्यासाठी ते प्यायला आवडते. लिंबू पाण्यात पिळून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर देखील मिळते. अनेक फायद्यांनी परिपूर्ण लिंबूपाणी जास्त प्यायल्यास आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते. चला तर जाणून घ्या लिंबू पाण्याचे काही साइड इफेक्ट्स.
छातीत जळजळ होऊ शकते
लिंबू अॅसिडीक फ्रुट आहे आणि त्याचं जास्त सेवन केल्यास याने छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर जास्त लिंबू पाणी पिणे टाळा.
दातांचे नुकसान
लिंबू पाणी जास्त प्यायल्याने दातांचे नुकसान होते. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, ज्यामुळे ते दातांच्या इनॅमल खराब करू शकतात. जर तुम्ही लिंबूपाणी पूर्णपणे सोडू शकत नसाल, तर थेट तुमच्या दातांवरील आम्लाचा संपर्क कमी करण्यासाठी ते स्ट्रॉने पिण्याचा प्रयत्न करा. याशिवाय लिंबूपाणी प्यायल्यानंतर लगेच दात घासणे टाळा.
तोंडात फोड येण्याची शक्यता:
अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त लिंबू पाणी प्यायल्याने तोंडात फोड येण्याची म्हणजेच छाले येण्याची समस्या होऊ शकते. लिंबूमध्ये असलेल्या सायट्रिक अॅसिडमुळे तोंडाच्या आत असलेल्या टिशूमध्ये सूज आणि जळजळ होते. अशा परिस्थितीत तुमचे दात आणि हिरड्या संवेदनशीलतेचा बळी ठरतात.
सतत यूरिनेशनची समस्या
लिंबूच्या रसाचं जास्त सेवन केल्यास आरोग्याशी निगडीत आणखी एक समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या म्हणजे सतत यूरिनेशनला जावे लागणे, ज्याने डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. अशात डिहायड्रेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पाणी पिणे वाढवले पाहिजे.
पोटात दुखू शकतेः
पाण्यात जास्त लिंबू पिळल्याने गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या सामान्य समस्या उद्भवू शकतात. त्याच्या लक्षणांमध्ये राग, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश होतो.
मायग्रेनची समस्याः
लिंबूवर्गीय फळांमुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते, कारण लिंबूवर्गीय फळांमध्ये टायरामाइन नावाचे विशेष सत्व असते, ज्यामुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते.
हाडांसाठी हानिकारक :
लिंबूचे आम्लीय स्वरूप हाडांसाठी देखील हानिकारक ठरू शकते. म्हणूनच लिंबूचा जास्त वापर टाळावा.