Tarun Bharat

जाणून घ्या बीट आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे

Advertisements

बीटाचा रंग लाल असतो कारण त्यात ‘बेटालिन’ हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो. १०० ग्राम बीटमध्ये ८७.५८ ग्राम पाणी आणि ४३ कॅलरीज असतात.

आरोग्यासाठी फायदे beatrout, health, aarogya, importance of beatrout

रक्तदाब कमी होतो.
बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक ॲसिडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक ॲसिडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायलास उत्तम.

हृदयासाठी गुणकारी.
बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचं असतो. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका रोखण्याचं काम नायट्रेट करतं. बीटमध्ये असलेले फायबर्स कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइडला नियंत्रित करण्याचं काम करतात.

वजन कमी करण्यासाठी उत्तम.
फायबर्स आणि भरपूर प्रमाणातील पाणी यामुळे बीट हे वजन कमी करण्यासाठी उत्तम समजलं जातं. फायबर्स तुमची भूक कमी करण्याचं काम करतात. फायबर असलेलं अन्न घेतल्याने पोट भरलं असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे भूक कमी लागते आणि परिणामी वजन कमी होतं.

मेंदू तल्लख होतो.
नायट्रेटमुळे मानसिक आरोग्य आणि आकलनशक्ती मजबूत होते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे नायट्रेटमुळे रक्तवाहिन्या प्रसारण पावतात. रक्तवाहिन्या प्रसारण पावल्यामुळे मेंदूपर्यंत जास्तीतजास्त रक्त पोहोचतं. रक्तपुरवठा सुरळीत झाल्याने मेंदू जोशाने काम करू लागतो.

त्वचा तजेलदार दिसू लागते.
बीटरुट्समध्ये विटॅमीन आणि खनिज मोठ्याप्रमाणात असतात. विटॅमीन आणि खनिजांमुळे त्वचा तजेलदार दिसते. तसेच शरीरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलेजन प्रथिनांची वाढ होते.

डोळ्यांसाठी गुणकारी.
बीटमध्ये असलेल्या विटॅमीन अ च्या मुबलकतेमुळे मोतीबिंदू होण्याचा धोका टळतो. तसेच वयोमानामुळे येणाऱ्या अंधत्वावर प्रतिबंध लागतो.

पचनशक्ती वाढते.
बीटमध्ये असलेले फायबर्स पचनशक्ती सुरळीत ठेवण्याचं काम करतात. पोटात दुखणे, बद्धकोष्ठ सारखे त्रास होत नाहीत.

अशक्तपणा कमी होतो.
बीटमध्ये असलेलं लोहाचं प्रमाण अशक्तपणावर (रक्तक्षय) मात करतं. लोह या खानिजामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढून अशक्तपणा कमी होतो. बीटमध्ये असलेल्या विटॅमीन क मुळे लोह जास्तीतजास्त शोषून घेण्यास मदत होते.

जळजळ कमी होते.
बीटला लाल रंग देणाऱ्या बेटालिन रंगद्रव्यात औषधी गुणधर्म सुद्धा असतात. जळजळ होणे आणि सूज येणे या समस्या बेटालिनमुळे कमी होतात.

कॅन्सरचा धोका कमी होतो.
बीटमध्ये असलेल्या बायोअक्टीव्ह कंपाउंडमुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत.बीटच्या या फायद्यावर अजूनही पूर्ण संशोधन व्हायचं आहे.

Related Stories

मुंबईहून येणाऱ्या लोकांवर कर्नाटक सरकारचे विशेष कोविड पाळत ठेवण्याचे आदेश

Sumit Tambekar

कोल्हापूर : शासनाच्या आरोग्य योजनेतून होणार ‘म्युकर मायकोसिस’वर उपचार

Abhijeet Shinde

नेब्युलायजरची संजीवनी

Omkar B

चर्चा जलनेतीची

Omkar B

वजन नियंत्रणासोबतच हे आहेत ओट्स खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Kalyani Amanagi

पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला केंद्र सरकारची परवानगी; पण…

datta jadhav
error: Content is protected !!