71 वर्षांची महिला बास्केटबॉलपटू
जगात अनेक प्रसिद्ध बास्केटबॉलपटूंचे नाव प्रख्यात आहे. परंतु अधिक वय झाल्यावर हे खेळाडू खेळणे सोडून देतात. याचमुळे ते केवळ स्वतःच्या गेमच्या व्हिडिओंद्वारे लोकांच्या आठवणींमध्ये राहतात. परंतु सध्या एक 71 वर्षीय महिला चर्चेत असून ती स्वतःच्या कमालीच्या बास्केटबॉलमधील कौशल्याद्वारे लोकांना थक्क करत असून सोशल मीडियावर तिची कहाणी व्हायरल होत आहे.
मेक्सिकोत राहणाऱया एंड्रिया गार्शिया लोपेझ यांना सध्या लोक मायकल जॉर्डनच्या नावावर ‘ग्रॅनी जॉर्डन’ असे संबोधित आहेत. त्या 71 वर्षांच्या असून सोशल मीडियावर स्वतःच्या क्रीडाकौशल्यामुळे चर्चेत आहेत. त्यांना बास्केटबॉल खेळताना पाहून लोक थक्क होत आहेत, कारण त्या एखाद्या व्यावसायिक बास्केटबॉलपटूप्रमाणे खेळतात.
कमालीचे कौशल्य
ही महिला एक स्थानिक कारागीर आहे. या वयात आता गुडघेदुखी सुरू झाली असली तरीही बास्केटबॉल खेळणे बंद करणार नसल्याचे त्यांचे सांगणे आहे. सोशल मीडिया साइट टिकटॉकवर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात त्या लोकांसोबत बास्केटबॉल खेळताना दिसून येतात.
अन्य वृद्ध फुटबॉलमध्ये प्रसिद्ध
सोशल मीडियावर लोक या महिलेचे प्रचंड कौतुक करत आहेत. ती खऱया अर्थाने सुपरस्टार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर काही लोकांनी ही महिला एनबीए स्टार्सना देखील मागे टाकू शकते असे म्हटले आहे. जून महिन्यात केरळमधील एका वृद्ध इसमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात तो फूटबॉलसोबत कमालीच्या ट्रिक्स करताना दिसून आला. त्याच्या फ्रीस्टाइल ट्रिक्सशी संबंधित व्हिडिओची मोठी चर्चा झाली होती.