वृत्तसंस्था/ टोकियो
स्पेनची अग्रमानांकित पॉला बेडोसाला येथे सुरू झालेल्या पॅन पॅसिफिक ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या दुसऱयाच फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनची युवा खेळाडू झेंग किनवेनने तिचे आव्हान संपुष्टात आणले.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱया बेडोसाला 36 व्या मानांकित झेंगविरुद्ध झगडावे लागले. तिच्या या सामन्यात एकही विबनतोड सर्व्हिस करता आली नाही. झेंगने ही लढत 6-3, 6-2 अशी सहज जिंकत दुसरी फेरी गाठली. झेंगने पहिल्या फेरीत जपानच्या मिसाकी दोईवर 6-2, 6-4 असा विजय मिळविला होता. तिची उपांत्यपूर्व लढत बेल्जियमची एलिस मर्टेन्स किंवा अमेरिकेची क्लेअर लियू यापैकी एकीशी होईल. बेडोसाप्रमाणे दुसरी मानांकित कॅरोलिन गार्सियालाही पराभवाचा धक्का बसला.