ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Beed BJP city president Bhagirath biyani commits suicide बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडली. त्यानंतर घरातील नातेवाईकांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. भगीरथ यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.
अधिक वाचा : सेक्सटॉर्शनमुळे पुण्यात तरुणाची आत्महत्या
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भगीरथ यांच्या आत्महत्येमागे राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का, याची चौकशी सुरू केली आहे.