ऑनलाईन टीम / बीड :
अंबाजोगाई-लातूर महामार्गावर (major accident on ambajogai latur highway) झालेल्या ट्रक आणि क्रूझरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार ( seven died) झाले. तर 5 जण जखमी असून, त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील नंदगोपाल दूध डेअरीजवळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लातूर येथील आर्वी गावातून गंगणे कुटुंबिय क्रूझर गाडीतून आंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. सकाळी दहाच्या सुमारास अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव नजीकच्या नंदगोपाल डेअरीजवळ त्यांच्या क्रूझरची आणि समोरुन येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की, क्रूझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात क्रूझरमधील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. या क्रूझरमध्ये एकूण 12 प्रवाशी होते. 5 प्रवाशी जखमी असून, त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप मयताची नावे समोर आली नसून, पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.