Tarun Bharat

पुढील गणेश चतुर्थीपूर्वी प्रतिमूर्ती अडीचशे रु. अनुदान

Advertisements

आमदार तथा हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांचे  मूर्तिकारांना आश्वासन

प्रतिनिधी /पेडणे

पारंपरिक कला टिकवून ठेवण्यासाठी चिकण मातीपासून मूर्ती बनविणाऱया मूर्तिकारांना पुढच्या वर्षांपासून प्रत्येक मूर्तीमागे दोनशे पन्नास रुपये अनुदान दिले जाईल. सदर अनुदान पुढील गणेश चतुर्थीपूर्वी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अश्वासन पेडणेचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी दिले.

    पेडणे येथे हस्तकला महामंडळातर्फे संबंधित गणेश मूर्तिकारांना चिकणमातीचे मळणी यंत्र वितरित केले. यावेळी व्यासपीठावर हस्तकला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मेलवीन वाझ, अधिकारी डॉम्निक परेरा, पेडणे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका उषा नागवेकर, राखी कशालकर, अश्विनी पालेकर, विशाखा गडेकर, नगरसेवक मनोज हरमलकर, सिद्धेश पेडणेकर, शिवराम तुकोजी, पंच भूषण उर्फ प्रदीप नाईक पंच सुबोध महाले,  सूर्यकांत तोरस्कर आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कलाकार आणि त्यांचे जीवन हे आपण जवळून पाहिले आहे. अशा कलाकारांना आणि त्यांची पारंपरिक कला टिकून ठेवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कलाकारांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहे. अलिकडे मूर्तीसाठी लागणारी माती तसेच ती मळण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. माती मळण्यासाठी कलाकारांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंत्र सामुग्री वितरित केली. अशा प्रकारचे यंत्र उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी लगेच मंजुरी दिली. त्यामुळे ही यंत्रे मूर्तिकारांना प्रदान करण्यात येत आहेत. त्याचा लाभ मूर्तीकाराने स्वतःसाठी वापर करून आपल्या शेजारी आपल्या गावात जे मूर्तिकर आहेत, त्यांनाही या यंत्राचा लाभ देण्याची सोय करावी, असेही आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी केले.

पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालणार

 विविध राज्यांत गणेशमूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, तेवढय़ा मूर्ती हस्त कलाकार तयार करू शकत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी वाढल्याचे चित्र आहे. मात्र पीओपीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा ऱहास होतो जातो, याची दखल घेणे आवश्यक आहे. यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वर पूर्णपणे बंदी आणून केवळ चिकण मातीचा वापर करणाऱया मूर्तिकारांना अनुदान देण्याबरोबरच माती मळण्यासाठी ही यंत्र दिले इतर तालुक्मयातही दिली जाईल, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी सांगितले

   नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांनी या कार्यक्रमात वितरीत केलेल्या यंत्राचा जास्तीत जास्त वापर करून पारंपरिक कला टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुरुदास कालेकर (हणखणे), महेश तुळस्कर  (नागझर) व अरुण पालयेकर (खारेबांध -पेडणे) यांना माती मळणी यंत्रे प्रदान करणात आली. स्वागत व सूत्रसंचालन कृष्णा अरविंद पालेकर यांनी केले.

Related Stories

दुचाकी चोरटय़ाला अटक सहा दुचाकी जप्त

Amit Kulkarni

इटलीत अडकलेल्या 300 गोमंतकीय दर्यावर्दीचे आज गोव्यात आगमन, सकाळी व दुपारी दोन विमाने दाबोळीत दाखल होणार

Omkar B

वेतन थकबाकीप्रश्नी एमपीटीच्या कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

Omkar B

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोव्यातही व्हावी

Patil_p

बेजबाबदार डॉक्टरांवर त्वरित कारवाई करावी

Amit Kulkarni

शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानतर्फे आवळे भोजन, नौकाविहार

Patil_p
error: Content is protected !!