Tarun Bharat

‘दूरदर्शन’फेम तबस्सुम काळाच्या पडद्याआड

 अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम

मुंबई / वृत्तसंस्था

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘दूरदर्शन’फेम अशी ओळख असलेल्या तबस्सुम यांचे नुकतेच निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. तबस्सुम यांना शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मातोश्री तबस्सुम यांनी शुक्रवार, 18 नोव्हेंबरच्या रात्री अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांचा पुत्र होशांग गोविल यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. अंतिम संस्कारानंतरच आपल्या निधनाची वार्ता लोकांना द्यावी, अशी त्यांची इच्छा असल्यामुळे शनिवारी ही माहिती देण्यात येत असल्याचे स्पष्टीकरणही होशिल यांनी दिले आहे.

तबस्सुम यांचा शुक्रवारी रात्री 8.40 वाजता हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला. त्यांची प्रकृती उत्तम होती. दहा दिवसांपूर्वी आम्ही शूटिंगही केले होते. आम्ही पुढच्या आठवडय़ात शूटिंगही करणार होतो. हे सर्व अचानक घडले. त्यांना गॅस्ट्रिकचा त्रास होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला, मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली. दोन मिनिटांत त्यांना दोन हृदयविकाराचे झटके आले, असे मुलगा होशांग गोविल यांनी सांगितले.

21 वर्षे दूरदर्शनवर काम

तबस्सुम यांनी 1947 मध्ये ‘नर्गिस’ या हिंदी चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. 70 च्या दशकात त्यांनी एक यशस्वी टेलिव्हिजन होस्ट म्हणून आपला ठसा उमटवला. दूरदर्शनवर 21 वर्षे चाललेल्या ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ या टॉक शोमध्ये त्यांनी अनेक बडय़ा व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. हा शो 1972 मध्ये सुरू झाला आणि 1993 पर्यंत चालला. गेल्या अनेक वर्षांपासून तबस्सुम आपल्या यूटय़ूब चॅनलसाठी सतत व्हिडीओ बनवत होती.

अयोध्येत जन्म, मुंबईत निधन

तबस्सुम यांचा जन्म 9 जुलै 1944 रोजी अयोध्येत झाला. तर मुंबईत निधन झाले. त्यांचे वडील अयोध्यानाथ सचदेव आणि आई असगरी बेगम हे स्वातंत्र्यसैनिक होते. वयाच्या तिसऱया वर्षी त्या पहिल्यांदा पडद्यावर झळकल्या. ‘दीदार’ चित्रपटात नर्गिसची बालपणीची व्यक्तिरेखा साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. तबस्सुम यांचा विवाह रामायणात रामाची भूमिका करणाऱया अरुण गोविल यांचे बंधू विजय गोविल यांच्याशी झाला होता. त्यांना होशांग हा पुत्र असून तो अभिनेता आहे.

Related Stories

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित

Patil_p

जुन्या आणि नव्या करप्रणालीसाठी वेगवेगळ्या घोषणा ,कसे असतील नव्या कररचनेतील टप्पे

Archana Banage

मिझोराम राज्याने वाढवला आणखी दोन आठवडे संपूर्ण लॉक डाऊन

Tousif Mujawar

काँग्रेसवर आता विश्वास नाही : एआययुडीएफ

Amit Kulkarni

पेटीएमच्या तोटय़ात वाढ

Patil_p

गंभीर आजारी मुलांना ऑक्टोबरपासून लस

Amit Kulkarni
error: Content is protected !!