Tarun Bharat

ट्रॅक्टर उलटून बेळवट्टीचा तरुण ठार

शिवारात नांगरताना घडली दुर्घटना : परिसरात हळहळ : कुटुंबीयांचा आक्रोश

वार्ताहर /किणये

ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात नांगरताना ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे त्याखाली सापडून बेळवट्टीचा तरुण जागीच ठार झाला. विक्रम कृष्णा हरगुडे (वय 25 ) असे त्या तरुणाचे नाव असून सदर अपघात मंगळवारी सकाळी 11 च्या दरम्यान झाला. शेतात काम करताना तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे बेळवट्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, विक्रम हरगुडे हा मंगळवारी सकाळी आपल्या शेतात रताळी काढण्यासाठी नांगरट करीत होता. ट्रॅक्टर बांधाच्या बाजूने चालवित असताना अचानक तोल गेल्यामुळे  उसाच्या पीकाजवळ सदर ट्रॅक्टर पलटी झाला अन् विक्रम याच्या अंगावरच

ट्रॅक्टर कोसळला. यात विक्रमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच ठार झाला, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

विक्रम हा आपल्या आई-वडिलांना मदत व्हावी या उद्देशाने शेती करीत होता. आपल्या मुलगा ट्रॅक्टरखाली सापडल्याचे पाहून आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

ग्रामीण पोलीस स्थानकाचे पीएसआय लकाप्पा जोडट्टी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. विक्रमचा मृतदेह सरकारी इस्पितळात नेण्यात आला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री 10:30 नंतर बेळवट्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोन दिवसांत दोन तरुण शेतकऱ्यांचा बळी

लागोपाठ दोन दिवसांत दोन तऊण शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिजगर्णी पुलाजवळ थांबलेल्या तरुणाला ट्रकने जोराची धडक दिल्यामुळे सोनोली गावचा तरुण दिग्नेश झंगरूचे जागीच ठार झाला. दिग्नेश हा शेती करीत होता. मंगळवारी सकाळी बेळवट्टी गावचा तरुण विक्रम हरगुडे हा ट्रॅक्टर पलटी झाल्याने जागीच ठार झाला. दोन तरुण शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

गोकाकच्या नगराध्यक्षपदी जयानंद हुनश्याळ

Patil_p

बेंगळूर : एचएएलकडून शासकीय रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका दान

Archana Banage

सुपर किंग्स, ग्लॅडिएटर्स संघ विजय

Amit Kulkarni

बेळगावच्या दुसऱ्या रेल्वेगेटचा लोखंडी खांब कोसळला

Tousif Mujawar

सुरक्षित अंतरासाठी एपीएमसीची पार्किंग बाहेर

Patil_p

भगवेमय वातावरण; हजारोंची उपस्थिती

Amit Kulkarni