पुणे / वार्ताहर :
Belgaon fake police arrested in Pune खोट्या प्रकरणांमध्ये अडकविण्याची धमकी देत 5 लाखांची खंडणी उकळणाऱ्या बेळगावच्या तोतया पोलिसाला पुण्यातील गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मधुकर विलास सापळे (रा. जांभुळवाडी रोड, आंबेगांव, मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर सापळे याने पुण्यातील विमाननगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादींना पोलीस असल्याची बतावणी करत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यांच्याविरूद्ध अकोला येथे पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे खोटे सांगितले. तसेच फिर्यादी पुण्यात राहत असलेल्या सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या सहीचे बनावट पत्र तयार करुन घेतले. आरोपीने वेगवेगळी भीती घालून फिर्यादीकडून ऑनलाईन माध्यमातून 5 लाख 5 हजार रूपयांची खंडणी उकळली. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करीत होते. गुन्हा निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर पाटील, सुधीर इंगळे, राहुल सकट, अमोल वाडकर यांनी केली.
अधिक वाचा : MPSC ची ‘ती’ यादी तात्पुरत्या स्वरुपाची