प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राहकसेवेमध्ये बेळगाव विमानतळ देशात 21 व्या स्थानी असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या सर्व्हेतून उपलब्ध झाली आहे. जानेवारी ते जून 2022 मध्ये हा सर्व्हे घेण्यात आला होता. बेळगाव विमानतळावर असणाऱया उत्तम सेवा-सुविधांमुळे देशातील पहिल्या 25 विमानतळांमध्ये बेळगावचा समावेश झाल्याने कौतुक होत आहे.
प्रत्येक सहा महिन्यांनी देशातील सर्व विमानतळांचा सर्व्हे केला जातो. विमान प्रवासादरम्यान दिल्या जाणाऱया सेवा-सुविधांमध्ये प्रवासी समाधानी आहेत का? याचा समावेश या सर्व्हेमध्ये असतो. मागीलवषी 45 व्या स्थानी असणारे बेळगाव विमानतळ यावेळी मात्र 21 व्या स्थानी पोहोचले आहे. त्यामुळे 2021 पेक्षा 2022 मधील कामगिरी उत्तम ठरली आहे.