विधानसभा निवडणूक २०२३ च्या मतदानासाठी फक्त आता ३ दिवस शिल्लक राहिल्याने प्रचारकार्य युद्धपातळीवर आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांना उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
शहरातील खडक गल्लीचा भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा मिळालेला असून गल्लीच्या वार्ताफलकवर मजकूर लिहून तसेच मोठमोठे कमान व बॅनर लावून पाठिंबा व्यक्त करण्यात येत आहे. आज वड्डरवाडी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी या भागातील नागरिकांनी आपल्याला कोण कोणत्या त्या सोयी सुविधा हव्या आहेत याची माहिती दिली. यावेळी सर्वांच्या समस्या जाणून घेऊन ती सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महांतेश नगर येथे उमेदवार डॉ रवी पाटील यांनी नागरिकांची भेट घेऊन यांच्या भागात कोणकोणत्या त्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत याची माहिती घेतली. येणाऱ्या काळात सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली आणि दहा मे रोजी मतदान करून भाजपला बहुमताने विजयी करा अशी विनंती केली.
गांधीनगर परिसरात प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्वांनी उत्साहपूर्ण आणि जल्लोषी वातावरणात त्यांचे स्वागत केले. येत्या 10 मे रोजी सर्वांना बहुमताने भाजपला विजयी करून द्यावे अशी विनंती सर्वांना केली यावेळी सर्वांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ रवी पाटील यांच्या समर्थनार्थ खडकगल्ली येथे अनिल बेनके यांनी प्रचार केला.
खड्कगल्ली येथील श्री मरगाई लक्ष्मी मंदिरात त्यांनी पूजाविधी करून प्रचाराला सुरु केली. सोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे ही उपस्थित राहून त्यांनीदेखील उमेदवार डॉ रवी पाटील यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. खड्कगल्ली, भडकल गल्ली, चव्हाट गल्ली परिसरात प्रचारदौरा सुरु झाला. गल्लोगल्लीत त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. मतदारातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.