Tarun Bharat

संजय राऊतांना बेळगाव न्यायालयाचे समन्स ; तर कोर्टात बोलावून अटक करण्याचा डाव- संजय राऊत

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव न्यायालयाने (Belagavi District Court) समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना १ डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. हजर न राहिल्यास राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ३० मार्च २०१८ रोजी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका बेळगावातील स्थानिक पोलिसांनीच ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. आता या प्रकरणी काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर बेळगाव कोर्टाच्या समन्सनंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली असून मला कोर्टात बोलावून अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बेळगाव कोर्टाच्या समन्सनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
बेळगाव कोर्टाच्या समन्सनंतर संजय राऊत यांनी मला कोर्टात बोलावून अटक करण्याचा डाव आहे, असे मत त्यांनी व्यक्त केलंय. बेळगाव कोर्टाकडून संजय राऊत यांना २०१८ मधील एका भाषणासंबंधी समन्स बजावण्यात आले आहे. यावर बोलण्यासाठी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांना बोलून कोर्टात हजर राहणार असून बेळगावसाठी १७० वा हुतात्मा होण्याची माझी तयारी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा करा – उदयनराजे भोसले

Related Stories

कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करा : अजित पवार

Tousif Mujawar

गाबित समाजतर्फे १७ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Tousif Mujawar

येडियुराप्पांना धक्का ! मुलगा विजयेंद्रला मंत्रिमंडळात स्थान नाही

Archana Banage

भाजपचे हिंदुत्व केवळ राजकीय स्वार्थासाठी

Kalyani Amanagi

सोलापुरात आज 90 कोरोना पॉझिटिव्ह, 9 जणांचा मृत्यू

Archana Banage

पावसाने पुलांवर पाणी ; पंढरीचे तीन महामार्ग बंद

Patil_p