Tarun Bharat

बेळगाव-दिल्ली विमानसेवा फेब्रुवारीपासून पूर्ववत

बेळगाव : तांत्रिक कारण देत स्पाईस जेट विमान कंपनीने बेळगाव-दिल्ली विमानफेरीचे बुकिंग 10 डिसेंबरपासून बंद केले आहे. बेळगावमधील उद्योजक, व्यापारी, सैनिक, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कंपनीने फेब्रुवारी 2023 पासून विमानफेरी पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.                                    

 मुंबई, हैद्राबाद, बेंगळूर या विमानफेऱ्या रद्द केल्यानंतर दिल्ली शहराची सेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. देशाच्या महत्त्वाच्या शहरांना सुरू असणारी सेवा प्रवासीसंख्या असतानाही बंद केली जात होती. बेळगाव विमानतळचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी व्यक्त होत होती. अनेकांनी तशी तक्रारही केली.

तात्पुरत्या स्वऊपात बंद 

 तांत्रिक समस्या असल्याने कंपनीने बेळगाव-दिल्ली विमानफेरी तात्पुरत्या स्वऊपात बंद केली होती. नागरिकांची मागणी पाहून फेब्रुवारी 2023 पासून विमानफेरी पुन्हा सुरू होईल, असे विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी सांगितले.

Related Stories

रमेश कुमारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वादंग

Amit Kulkarni

ही तर भाषेच्या अस्तित्वाची लढाई!

Amit Kulkarni

रेल्वेस्थानक नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू

Omkar B

बारवाडात नवनिर्वाचित, गुणवंतांचा सत्कार

Patil_p

बांदल सेना शौर्य दिवस गांभीर्याने

Amit Kulkarni

मंदिरे सर्वांना ऊर्जा देणारी शक्तीपीठे

Omkar B