Tarun Bharat

बेळगाव जिल्हा ई-केवायसीत प्रथम

Advertisements

बैलहोंगल, हुक्केरी, चिकोडी, खानापूर तालुक्मयात ई-केवायसी अधिक

प्रतिनिधी/ बेळगाव

पी. एम. किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱयांना प्रोत्साहन धन म्हणून 6 हजार रुपये वर्षभरात दिले जातात. यासाठी ई-केवायसी केली जात आहे. यामध्ये बेळगाव जिल्हा प्रथम स्थानावर आहे. राज्यात सर्वात जास्त ई-केवायसीचे काम बेळगाव जिल्हय़ात झाले आहे. पहिल्या पाच तालुक्मयांमध्ये बेळगाव जिल्हय़ातील तालुक्मयांचा समावेश आहे.

किसान सन्मान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी केली जात आहे. जिल्हय़ातील 5.69 लाख शेतकऱयांपैकी 3.10 लाख शेतकऱयांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्हा इतर जिल्हय़ांच्या तुलनेत पुढे आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱया शेतकऱयांना किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून वार्षिक 6 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. मात्र, यामध्ये देखील काहींनी खोटी माहिती पुरवून या योजनेचा लाभ घेतला आहे. हे थांबविण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱयांना जनसेवा केंद्र आणि इतर ठिकाणी ई-केवायसीची कामे केली जात आहेत. आतापर्यंत जिल्हय़ातील ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सुरू आहे.

जिल्हय़ातील बैलहोंगल, हुक्केरी, चिकोडी आणि खानापूर तालुक्मयातील ई-केवायसी केलेल्या लाभार्थी  शेतकऱयांची संख्या अधिक आहे. राज्यातील 53 लाख 95 हजार शेतकऱयांपैकी आतापर्यंत केवळ 21 लाख 4 हजार लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी केली आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्हाच आघाडीवर आहे. ई-केवायसी करून घेण्यासाठी कित्येक वेळा मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही बऱयाच शेतकऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, आता वेळेत ई-केवायसी न करणाऱया शेतकऱयांना या योजनेतून कमी केले जाणार आहे. त्यामुळे तातडीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

शिवनगौडा पाटील (उपनिर्देशक कृषी खाते)

पी. एम. किसान योजनेचा लाभ घेणाऱया शेतकऱयांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्य़ातील काही तालुक्मयांचा आकडा समाधानकारक असला तरी इतर तालुक्मयातून देखील शेतकऱयांनी ई-केवायसी करण्यासाठी पुढे यावे. जिल्हय़ात ई-केवायसीचे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Related Stories

दुसऱया रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

Patil_p

फ्रेंड्स फाऊंडेशन ग्रुपचे समाजोपयोगी कार्य

Amit Kulkarni

उपनगरात भीषण पाणीटंचाई

Omkar B

निपाणीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

निकृष्ट दर्जाचे पीपीई कीट ठरत आहेत त्रासदायक

Patil_p

कडोलीचा ऐतिहासिक दसरोत्सव आजपासून

Amit Kulkarni
error: Content is protected !!