जिल्हय़ाने आघाडी घेतल्याने समाधान : जिल्हय़ातील सहा विद्यार्थ्यांनी मिळविले पैकीच्या पैकी गुण : यावर्षीही विद्यार्थिनींची बाजी
प्रतिनिधी / बेळगाव
महाविद्यालयीन शिक्षणाची पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱया महत्त्वाच्या दहावी परीक्षेचा निकाल अखेर गुरुवारी जाहीर झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाने मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी निकालाच्याबाबतीत राज्यात आघाडी घेतली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे परीक्षा घेण्यात आल्या नक्हत्या. त्यामुळे जिल्हय़ाचा निकाल काय असेल? याकडे साऱयांच्या नजरा लागून होत्या. मात्र यावर्षी बेळगाव जिल्हय़ाने आघाडी घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्हय़ाची मोठय़ा प्रमाणात पिछेहाट झाली होती. यावषी जिल्हय़ाचा निकाल 87.80 टक्के लागला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 32 हजार 866 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 28 हजार 857 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 4 हजार 9 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दोन वर्षांनंतर रितसर परीक्षा पार पडल्या. त्यामुळे यावषी विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची उत्सुकता लागून होती. गुरुवारी हा निकाल शिक्षण खात्याने जाहीर केला.
गेल्या काही दिवसांपासून परीक्षेच्या निकालाबद्दल तारखेचा घोळ सुरू होता. मात्र गुरुवारी शिक्षण खात्याने अखेर निकाल जाहीर केला. दहावीची परीक्षा 28 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान 139 परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. यावर्षीही विद्यार्थिनींनी पास होण्यात आघाडी मिळविली. सातत्याने बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाची दहावीच्या निकालात घसरण होत होती. यंदा शिक्षण खात्याने आपल्या परिश्रमामुळे चांगला निकाल दिला आहे.
दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना सोयीचे ठरते. त्यामुळे आज निकाल जाहीर होणार असल्याकारणाने सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांचे निकालाकाडे लक्ष लागून होते. गुरुवारी शिक्षण खात्याने निकाल जाहीर केल्यानंतर शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर बहुतेक विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलवरच निकाल पाहिला.
याबरोबरच ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. काहींना अपेक्षित निकाल मिळाल्याने चेहऱयावर हसू फुलले होते. तर अनेकांनी अपेक्षेपेक्षा जास्ती गुण घेतल्याने पालकांच्या चेहऱयावर आनंद दिसून अला. शिक्षण खाते आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱयांनी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांनी घेतलेले अपार परिश्रम यामुळे एसएसएलसी परीक्षेमध्ये बेळगाव जिल्हय़ाने आघाडी घेतली आहे. यंदाच्या एसएसएलसी निकालामध्ये बेळगाव जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे. जिल्य़्हय़ातील सहा विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण घेऊन चमकदार कामगिरी बजावली आहे. बेळगावच्या दोन विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण घेऊन स्पृहणीय यश मिळविले आहे.
एसकेई सोसायटी संचालित एम. व्ही. हेरवाडकर शाळेच्या अमोघ नागसुरेश कौशिक या विद्यार्थ्यांने पैकीच्यापैकी गुण मिळविले आहे. तसेच केएलएस शाळेच्या वेंकटेश डोंगरे या विद्यार्थ्यांनेसुद्धा पैकीच्यापैकी गुण मिळविले आहेत. या दोन विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बेळगाव जिल्हय़ातील सौंदत्ती तालुक्मयातील सत्तीगेरी गावची विद्यार्थिनी सहना रायर, नंदगडच्या संगोळ्ळी रायण्णा स्मृती शाळेची विद्यार्थिनी स्वाती सुरेश तोलगी, रामदुर्गच्या केंब्रीज इंग्रजी माध्यमचा विद्यार्थी आदर्श हालभावी तसेच बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी रोहिणी गौडर या विद्यार्थ्यांनीसुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात चार विद्यार्थ्यांनी पैकीच्यापैकी गुण मिळविले आहेत.
आता धडपड पुढील प्रवेशासाठी
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हाती मिळाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी धडपड करावी लागणार आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पाल्याबरोबर पालकांचीही ओढाताण होणार आहे. कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? यासाठी विचारविनिमय सुरू होणार आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल पुढीलप्रमाणे
शैक्षणिक विभाग | परीक्षार्थी | उत्तीर्ण | अनुत्तीर्ण | टक्केवारी |
---|---|---|---|---|
बेळगाव ग्रामीण | 5615 | 597 | 518 | 90.77 |
बेळगाव शहर | 8556 | 6742 | 1714 | 79.73 |
बैलहोंगल | 4115 | 3922 | 233 | 94.39 |
कित्तूर | 1962 | 1661 | 301 | 84.68 |
खानापूर | 3657 | 3100 | 557 | 84.77 |
रामदुर्ग | 4003 | 3756 | 247 | 93.83 |
सौंदत्ती | 5018 | 4579 | 439 | 91.25 |
एकूण | 32866 | 28857 | 4009 | 87.8 |