संकेश्वर : मुंबईकडून बेळगावकडे भरधाव निघालेल्या कारने समोरून जाणाऱया ट्रक्टरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील पाच वर्षाची बालिका जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सायंकाळी होन्नोळी फाटय़ानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडला. समन्विता प्रसाद अप्पुगोळ (वय 5 रा. बेळगाव) असे मृत बालिकेचे नाव आहे.
कारचे चालक-मालक प्रसाद अप्पुगोळ हे आपली पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, पाच वर्षाची मुलगी यांच्यासमवेत मुंबईहून बेळगावकडे येत होते. व्होन्नोळी फाटय़ानजीक राष्ट्रीय महामार्गावर येताच ओव्हरटेक करताना समोरून जाणाऱया ट्रक्टरला जोराची धडक दिल्याने कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. समोरच्या सीटवर बसलेल्या बालिकेच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन ती जागीच ठार झाली. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. मुलीचे वडील प्रसाद अप्पुगोळ मुंबईतील एसबीआयमध्ये अधिकारी आहेत.