Tarun Bharat

राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव ज्युडो संघाला सर्वसाधारण विजेतेपद

12 सुवर्ण, 6 रौप्य, 6 कांस्य पदकासह यश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथे 40 व्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगाव जिल्हा ज्युडो संघाने 12 सुवर्ण, 6 रौप्य, 11 कांस्य पदकासह घवघवीत यश संपादीत करून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेत बेळगाव जिल्हा युवजन क्रीडा खात्याच्या ज्युडो संघाने भाग घेऊन यश संपादन केले. राज्यातील 500 हून अधिक ज्युडोपटूंनी त्यात भाग घेतला. सबज्युनियर 12 ते 14 वयोगटात सुरज सावंतने 40 किलो वजन गटात सुवर्ण, कार्तिक पावसकरने 55 किलो गटात सुवर्ण, अमृता नाईकने 36 किलो वजन गटात सुवर्ण, सोनालिकाने 44 किलो वजनी गटात सुवर्ण, शगुफ्ता वालवेकरने 48 किलो वजन गटात सुवर्ण, आफ्रिन बानोने 57 किलो वजन गटात सुवर्ण, श्वेता 40 किलो वजनी गटात सुवर्ण, 14 ते 18 वयोगटात अरूण माळीने 60 किलो गटात सुवर्ण, हरिष सातवडेने 73 किलो वजन गटात सुवर्ण, ऐश्वर्याने 44 किलो वजन गटात सुवर्ण, रक्षिता कोमेरने 52 किलो वजन गटात सुवर्ण, भूमिका व्ही. एन.ने 70 किलो वजनी गटात सुवर्ण पटकाविले.

मिनी गट 10 ते 12 वयोगट-श्रेयल 30 किलो गट रौप्य, चेतन कोळी 20 किलो गट कांस्य, सबज्युनियर 60 किलो गट अब्दुल रेहमानने रौप्य मिळविले. या स्पर्धेत कांस्यपदक पटकाविलेले खेळाडू- अमित 40 किलो गट, रियाज 55 किलो गट, आर्यन 66 किलो गट, सुमित्रा 44 किलो गट, निशा कंग्राळकर 57 किलो गट, साई पाटील 50 किलो गट, काव्या जी. 52 किलो गट.

कॅडेट गटात प्रवीण बोडीगेरी 50 किलो गट, रोहन 81 किलो गट, साईश साईस्वारीने 70 किलोवरील गटात रौप्य तर ब्रम्हाप्पा 60 किलो गट, प्रकाश 55 किलो गट, दिशांक 90 किलोवरील गटात कांस्य पदक पटकाविले. या सर्वांना युवजन क्रीडा खात्याच्या ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील, सहाय्यक प्रशिक्षिका कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन तर जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बसवराज मिलनट्टी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी निवारा केंद्रांची उभारणी करा

Patil_p

दीन-दलितांना निधी उपलब्ध करून द्या

Patil_p

गळत्या निवारणाकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

खानापुरात मऱयाम्मादेवीची अभूतपूर्व शोभायात्रा

Amit Kulkarni

फार्माको व्हिजीलन्स सप्ताह केएलई फार्मसीतर्फे उत्साहात

Amit Kulkarni

संतीबस्तवाड, नावगे क्रॉस येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni