जिल्हास्तरीय पदवीपूर्व व्हॉलीबॉल स्पर्धा : खानापूर, सौंदत्ती संघांचाही शेवटच्या चारमध्ये प्रवेश
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खाते व आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व पुरूष व महिलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत बेळगाव, कित्तूर, बैलहोंगल व सौंदत्ती संघानी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई संस्थेच्या सचिव लता कित्तूर, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक नागराज व्ही., माजी ज्ये÷ व्हॉलीबॉलपटू व सीपीआय बसनगौडा पाटील, भारतीय व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक बसवराज होसमठ, एसकेईचे सभासद आनंद सराफ, सिद्दरामेश्वर एस. बी. शिवनायकर, जी. एन. पाटील, क्रीडा प्राध्यापक देवेंद्र कुडची व प्राचार्य काशिनाथ मेळेद व्यासपिठावर उपस्थित होते.
बेळगाव, खानापूर, बैलहोंग, रामदुर्ग, सौंदत्तीसह इतर तालुक्मयातील पुरूष-महिला संघ या स्पर्धेत भाग घेतला आहे. सर्व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एच. एस. शिंगाडे, शंकर कोलकर, राजु चौगुले, भरत अक्षिमनी, सतीश सनदी, विनय नाईक, प्रशांत मनकाळे, मुत्तुराज चौका व आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थीप्रतिनिधी उपस्थित होते. पुरूष गटात पहिल्या सामन्यात कित्तूर संघाने सौंदत्ती संघाचा 15-4, 15-10, दुसऱया सामन्यात बेळगाव संघाने रामदुर्ग संघाचा 15-6, 15-8, तिसऱया सामन्यात खानापूर संघाने सौंदत्ती संघाचा 15-10, 12-15, 15-11 अशा सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात बेळगाव संघाने रामदुर्ग संघाचा 25-13, 12-25, 15-11, दुसऱया सामन्यात कित्तूर संघाने सौंदत्ती संघाचा 25-17, 25-18, तिसऱया सामन्यात बैलहोंगल संघाने बेळगाव ग्रामीणचा 25-16, 20-25, 15-10 असा पराभव केला आहे. शनिवारी उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात येणार असून, दुपारी अंतिम सामने होणार आहेत.