बेळगाव : नगर विकास खाते व शहर विकास सचिवालयाने बेळगाव नगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार बेळगाव महापौरपद सामान्य महिला आणि उपमहापौरपद मागासवर्गीय महिला ब श्रेणी असे आरक्षित असेल.
महापौर उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असले तरी निवडणूक कधी होणार याची प्रतीक्षा आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याआधी महापौर निवडणूक व्हावी अशी आशा व्यक्त होत आहे.
नगर विकास खाते व शहर विकास सचिवाल्याने कर्नाटक राजपुत्रादरे राज्यातील बेळगावसह बेळ्ळारी , बेंगळूर, दावणगिरी, हुबळी-धारवाड, कलबुर्गी, मंगळूर, शिमोगा, म्हैसूर, तुमकुर आणि विजापूर या महानगरपालिकांच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण काल जाहीर केले.