स्टार एअरची आठवडय़ातून दोन दिवस विमानफेरी : दीड तासात नागपूरला पोहोचता येणार
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱया नागपूर शहराला बेळगावमधून शनिवार दि. 16 पासून विमानफेरी सुरू होत आहे. अवघ्या दीड तासात बेळगावमधून नागपूरला पोहोचता येईल. स्टार एअरने आठवडय़ातून दोन दिवस विमानफेरी सुरू केली असून पुढीलकाळात प्रवाशांची संख्या वाढल्यास विमानफेरी वाढविली जाण्याची शक्मयता आहे.
उडान 3 अंतर्गत बेळगाव विमानतळाची निवड झाल्यापासून कमी दरात बेळगावमधील प्रवासी विमानाचा प्रवास करीत आहेत. राज्यातील एकूण प्रवाशांची संख्या पाहता बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर बेळगावचा क्रमांक लागतो. बेळगावमधून सध्या देशभरातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू आहे. मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, पुणे, तिरुपती, इंदूर, अहमदाबाद, दिल्ली, सूरत, नाशिक, जोधपूर या अकरा शहरांना सध्या विमानसेवा सुरू असून बाराव्या शहराला शनिवारपासून विमानफेरी सुरू होणार आहे.
नागपूर विमानफेरीमुळे महाराष्ट्रातील चौथ्या शहराला बेळगावमधून जोडले जाणार आहे. नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानी सोबतच एक व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. या विमानफेरीमुळे बेळगावच्या व्यापारी क्षेत्राचाही विकास होणार आहे. स्टार एअरने मंगळवार व शनिवार असे दोन दिवस विमानफेरी सुरू केली आहे. अवघ्या दीड तासामध्ये प्रवासी नागपूरला पोहोचतील. बेळगावमधून नागपूरला रेल्वे अथवा बससेवा उपलब्ध नसल्याने विमानसेवेला मागणी वाढली आहे.
अशी असणार विमानफेरी
- बेळगाव (सकाळी 8.30 वा.) – नागपूर (सकाळी 10 वा.)
- नागपूर (सकाळी 10.30 वा.) – बेळगाव (दुपारी 12 वा.)