बेळगाव – बेळगावच्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला गुजरातला नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बेळगावच्या के एच कंग्राळी गावातील युवक आकाश धोडीया (१९) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे . बेळगावच्या एका खासगी शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलीला त्याने अहमदाबाद येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी नेले आणि येथे तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कॅम्प पोलिसात केली होती. खडेबाजार स्थानकाचे एसीपी चंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून मुलीचे संरक्षण केले आहे. मूळचा गुजरात येथील रहीवासी असणारा आरोपी आकाशला पोलिसांनी अटक केली आहे .
Trending
- हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त
- चारही जणांची दहा तास चौकशी
- गोव्यातून गेला तामिळनाडूतील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ईमेल
- सोमवारपासून दहावीची परीक्षा
- भंडारी समाजाच्या चार नेत्यांची सतावणूक बंद करावी : किरण
- जांबावलीच्या शिशिरोत्सवाला प्रारंभ 2 रोजी दामोदराचा गुलालोत्सव
- शहर तापले…पारा 38 अंशांवर
- ‘गृहलक्ष्मी’साठी पोस्ट खात्यात लाभार्थ्यांची रांग