क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गोवा येथे एक्सेल इन गोवा राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगाव शुटोकॉन कराटे डू संघटनेच्या कराटेपटूंनी सुयश संपादन केले.
म्हापसा येथील पेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या गोवा राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या शुटोकॉन कराटे डू अकादमीच्या विजयनगर व बोडकेनहट्टी शाखेच्या कराटेपटूंनी यश संपादन केले. 18 वर्षाखालील गटात श्रीशैल कुंडेकरने काटामध्ये सुवर्ण तर कुमेतीमध्ये कांस्य, 17 वर्षाखालील गटात ज्ञानेश्वर चिक्केने काटामध्ये सुवर्ण तर कुमेतीमध्ये कांस्य, 14 वर्षाखालील गटात प्रेमजीत भिलवडे व प्रिती देसाई यांनी काटामध्ये सुवर्ण व कुमेतीमध्ये रौप्य, 13 वर्षाखालील गटात श्रेयल कुंडेकर व नेहल पाटील यांनी काटामध्ये सुवर्ण, कुमेतीमध्ये रौप्य, 11 वर्षाखालील गटात वैभवी मोरजकरने काटामध्ये सुवर्ण, कुमेतीमध्ये रौप्य, 10 वर्षाखालील गटात श्रवण भोसले व श्रेयस कडोलकर यांनी काटामध्ये सुवर्ण, कुमेतीमध्ये रौप्य, 8 वर्षाखालील गटात धनवी मोरजकरने काटामध्ये सुवर्ण, कुमेतीमध्ये रौप्यपदक पटकाविले.
बेडकिहाळ शाखेच्या कराटेपटूंनी 17 वर्षाखालील गटात धनराज पाटीलने काटामध्ये कांस्य व कुमेतीमध्ये रौप्य, संकेत तवनोजीने काटा व कुमेतीमध्ये दोन सुवर्ण, 12 वर्षाखालील गटात जितेश तवनोजीने काटा व कुमेतीमध्ये 2 सुवर्णपदके पटकाविली. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पदके व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यांना प्रशिक्षक भरमाणी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.