बेळगाव : तुमकुर आणि बेंगलोर येथे कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्सनी बेळगांव संघाने 9 सुवर्ण 6 सिलव्हर 2 कांस्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले. तुमकुर आणि बेंगलोर येथे राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मध्ये सुमारें 8 जिल्हातून 300 च्या वर खेळाडूंनी भाग घेतला होता. फ्री स्टाईल स्केटिंग पदक विजेता अथर्व हडपड 1 रौप्य, हिरेन राजने 2 सुवर्ण, दृष्टी अंकलने 1 रौप्य, 1 कांस्य, अवनीश कोरीशेट्टीने 1 सुवर्ण, 1 रौप्य, रश्मिता अंबिगाने 2 सुवर्ण, जयध्यान एस राजने 2 सुवर्ण, देवेन बामणने 1 सुवर्ण, 1 रौप्य पदक पटकाविले. अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग पदक विजेता-साईराज मेंडकेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, आरटीस्टिक स्केटिंग पदक विजेता-खुशी आगशीमणाने 1 रौप्य, 1 कांस्य मिळविले. त्याना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर, यांच्या मार्गदर्शन लाभले. तर केएलई स्केटिंग रिंक , गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करीत आहेत.
Previous Articleव्हीटीयू बॅडमिंटन स्पर्धेत जीआयटीला विजेतेपद
Next Article अखेर आद्राने दिली बळीराजाला साथ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.