Tarun Bharat

बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी, अर्जुन स्पोर्ट्स संघ विजयी

केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने सिग्निचर्स स्पोर्ट्स क्लब संघाचा 60 धावांनी तर अर्जुन स्पोर्ट्सने इंडियन बॉईज संघाचा 4 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. ओम पाटील व शतकवीर दीपक राक्षे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 7 गडी बाद 267 धावा केल्या. त्यात दीपक राक्षेने 9 षटकार 16 चौकारांसह 71 चेंडुत 142 धावा करुन शतक झळकविले. त्याला प्रविण कराडेने 45, पार्थ पाटीलने 33, तर सोमनाथ सोमनाचेने 13 धावा केल्या. सिग्निचरतर्फे रकमान्ना सिद्धलिंगने 2 तर विनायक सिद्धलिंग, अनुराग पाटील, दत्तप्रसाद जांभवलेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्निचर स्पोर्ट्स क्लब अ संघाचा डाव 29.5 षटकात 207 धावात आटोपला. त्यात अमरदिप पाटीलने 3 षटकार 5 चौकारांसह 64, मंगेश शहापुरकरने 36, विशाल बेडकाने 32 तर संतोष चव्हाणने 21 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी तर्फे अभिषेक निकमने 60 धावात 4, प्रतिक कराडेने 2 तर प्रविण कराडे, प्रतिक वाणी, दीपक राक्षे व पार्थ पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱ्या सामन्यात इंडियन बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 गडी बाद 131 धावा केल्या. त्यात आरिफ बाळेकुंद्रीने 60 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे सिद्धांत यादव, सोहम कुलकर्णी, पार्थ नयनी व पंकज कनल यांनी प्रत्येकी 2 गडी तर ओमकार सातार्डेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्सने 27.1 षटकात 6 गडी बाद 135 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात ओम पाटीलने नाबाद 65 पार्थ नयनीने 29 धावा केल्या. इंडियन बॉईजतेर्फे अमृत बिरोडकरने 2 तर होसमणी, यळगुकर, देसाई, बाळेकुंद्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Related Stories

शिवसेनेचे सोमशेखर उग्रानी यांचा अर्ज दाखल

Patil_p

कडोली गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

कर्नाटकाचा एनसीए संघावर 9 गड्यांनी विजय

Amit Kulkarni

सीमाप्रश्नाचा ठराव आज मांडणार

Amit Kulkarni

शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस साजरा

Amit Kulkarni

खानापूर रोड दत्त मंदिर रस्त्याशेजारी भगदाड

Amit Kulkarni