यू-12 साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने रॉजर्स क्रिकेट क्लब संघाचा 8 गडय़ांनी तर युनियन जिमखाना संघाने निना क्रिकेट अकादमीचा 5 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अवनिश बसुर्तेकर, अनिश तेंडुलकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॉक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिला सामन्यात रॉजर्स क्रिकेट क्लबने 22 षटकात सर्व बाद 75 धावा केल्या. रजत संभाजीचेने 17 धावा केल्या. बीएससीतर्फे अवनिश बसुर्तेकरने 7 धावात 3, प्रितम मंतुर्गेमठ व इम्तियाज मंडळ यांनी प्रत्येकी 2, लक्ष खतायतने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससी अ संघाने 10 षटकात 2 बाद 76 धावा करून सामना 8 गडय़ानी जिंकला. आरूष पुत्रनने 6 चौकारासह 37, इंम्तियाज मंडळने 10 धावा केल्या. रॉजर्सतर्फे जतीन दुर्गाईने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात निना क्रिकेट अकादमीने 24.3 षटकात सर्व बाद 117 धावा केल्या. समर्थ चौगुलेने 22, कृष्णा पिसेने 17 धावा केल्या. जिमखानातर्फे महमद अब्बासने 17 धावात 3, विश्रुत कुंदरनाड व अनिश तेंडुलकर यांनी प्रत्येकी 2 तर विराज पाटील, सुरज सक्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 5 बाद 121 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. त्यात अनिश तेंडुलकरने 6 चौकारासह 41, महंमद हमजाने 20, महंमद अब्बासने 11 धावा केल्या. निनातर्फे समर्थ चौगुलेने 2, अकिब, झियान व अमार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.