विमानतळावरील दुसऱया एफटीओच्या कामाला सुरुवात : बांधकाम 5 हजार चौरस मीटर जागेत
प्रतिनिधी /बेळगाव
भविष्यात बेळगावची ओळख ही वैमानिक प्रशिक्षण केंद्र अशी होणार आहे. सांबरा येथील एअरमन टेनिंग स्कूलसोबत खासगी दोन फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) उभारले जात आहेत. एका एफटीओचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दुसऱया एफटीओच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे दोन्ही एफटीओ कार्यरत झाल्यास बेळगावची नवी ओळख निर्माण होणार आहे.
विमानतळांवर उपलब्ध जागेमध्ये खासगी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी नागरी हवाई उड्डाण खात्यातर्फे योजना आखण्यात आली. बेळगाव विमानतळावर दोन एफटीओंना मंजुरी मिळाली. परंतु कोरोनामुळे काम सुरू होण्यास विलंब झाला. अखेर 2022 मध्ये या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात विमानतळ प्राधिकरणाकडून मुख्य धावपट्टीपासून उभारण्यात येणाऱया एफटीओपर्यंत टॅक्सी ट्रक तयार करण्यात आला. त्यानंतर एफटीओच्या हँगर उभारणीला सुरुवात झाली.
प्रारंभी रेड बर्ड कंपनीने हँगर उभारणीला सुरुवात केली. 5 हजार चौरस मीटर जागेमध्ये एफटीओचे बांधकाम करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यापासून बेंगळूर येथील समवर्धने कंपनीनेदेखील एफटीओच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. लवकरच हे दोन्ही एफटीओ कार्यरत होणार आहेत.
काम लवकरच पूर्ण होण्याची शक्मयता
बेळगावमध्ये दोन फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनना मंजुरी मिळाली असल्याने या दोन्ही एफटीओंचे काम प्रगतिपथावर आहे. रेड बर्ड या कंपनीने हँगर उभारणीचे काम पूर्ण केले असून, समवर्धने कंपनीने आता सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे.
राजेशकुमार मौर्य (संचालक बेळगाव विमानतळ)