Tarun Bharat

दसरा हॉकी स्पर्धेत बेळगावच्या महिला संघाला विजेतेपद

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हा पंचायत, युवजन क्रीडा सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा विभागीय   हॉकी स्पर्धेत महिला गटात अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बागलकोट जिल्हा संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि म्हैसूर येथे होणाऱया राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. मृणाली भाटे व प्राजक्ता निलजकर यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

बागलकोट येथे बसवराज महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या दसरा विभागीय हॉकी स्पर्धेत महिला गटातील पहिल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने गदग जिल्हा संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात मानसी पाटीलने 2, शांता पवार, भावना व ईशा गवळी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने डीवायईएस धारवाड संघाचा टायब्रेकरमध्ये 4-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. बेळगाव जिल्हय़ातर्फे श्रेया, सौम्या, प्राजक्ता, मृणाली यांनी गोल केले.

अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने अटीतटीच्या लढतीत बागलकोट जिल्हा संघाचा 2-0 असा पराभव केला. पूर्वार्धात श्रेयाच्या पासवर विजयालक्ष्मी मुलीमनीने तर उत्तरार्धात प्राजक्ताच्या पासवर सौम्याने दुसरा गोल नोंदवला. स्थानिक बागलकोट जिल्हा संघाला अखेरपर्यंत गोल करता आला नाही. या संघाला हॉकी प्रशिक्षक सुधाकर चाळके व उत्तम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

Related Stories

वळिवामुळे भाजीपाला आवक कमी; दरात वाढ

Amit Kulkarni

७ ते २९ डिसेंबर दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन

mithun mane

नऊ जिल्ह्यांत 34 ठिकाणी लोकायुक्त छापे

Amit Kulkarni

शिक्षक बदली प्रक्रियेला स्थगिती

Amit Kulkarni

कॅम्प येथील हेस्कॉमच्या कामाची आमदारांकडून पाहणी

Amit Kulkarni

वॉर्डनिहाय साईराज चषक एपीएस वॉरियर्स संघाकडे

Amit Kulkarni