बेळगाव : अंदमान निकोबार येथे पोर्ट ब्लेअर येथे घेण्यात आलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत बेळगावच्या मुरलीधर योग गुऊकुल व सरस्वती वाचनालयाचे योगपटू सत्यम खांडेकर व रमित तिप्पण्णावर यांनी यश संपादन केले आहे.
अंदमान निकोबार येथे पोर्ट ब्लेअर येथे 14 ते 17 वयोगटातील योग स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये सत्यम खांडेकर यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक तर रमित तिप्पण्णावर याने तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकाविले आहे. हे दोन्ही स्पर्धक कोरे गल्ली, शहापूर येथील सरस्वती वाचनालय येथे सराव करत असून त्यांना योगगुरू मुरलीधर प्रभू, नव्या प्रभू, विश्वनाथ मणगुतकर, नागराज प्रभू यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.