बेळगाव : बेंगळूर येथे बेंगळूर क्रिकेट संघटना व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मिर्झा इस्माईल सय्यद चषक फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत स्वस्तिक संघाने सोशल क्रिकेट क्लब बेंगळूर संघावर 168 धावांची आघाडी मिळविली आहे. बेळगावच्या सुजय सातेरीने या मोसमातील आपले तिसरे शतक झळकविले.
सोशल क्रिकेट क्लबने 48 षटकात सर्व बाद 145 धावा जमविल्या. त्याला उत्तर देताना स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लब 2 संघाने 64.2 षटकात 8 बाद 313 धावा करीत 168 धावांची आघाडी मिळविली आहे. स्वस्तिक युनियन क्लबची 4 बाद 0 अशा स्थितीनंतर अनुभवी सुजय सातेरीने अमजद खानच्या साथीने पाचव्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी केली. अमजदने मदतीने 40 धावा केल्या. त्यानंतर सुजयने गौरव दिमानसमवेत सातव्या गडय़ासाठी 104 धावांची महत्वाची भागीदारी केली. त्यात गौरव दिमानने 77 धावा केल्या. सुजय सातेरीने 4 षटकार व 9 चौकाराच्या मदतीने 169 चेंडूत 133 धावा करीत तिसरे शतक झळकविले. याशिवाय माधव बजाजने 49 धावा केल्या. सोशल क्लबतर्फे अवनिश डी.ने 50 धावात 2 तर तृथ्वीराजने 54 धावात 2, श्रेयस अचरने 67 धावात 2, रितेश भटकळ, अश्विन हेगडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.