Tarun Bharat

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत

Advertisements

बेळगाव : काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरापासून ते तिसरे रेल्वेगेटपर्यंत उभारण्यात आलेली रेल्वेची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. यातील बर्‍याच अशा सिमेंटच्या प्लेट एका बाजूने वाकल्या असून त्या केंव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे या संरक्षक भिंतीची वेळीच दुरुस्ती न केल्यास अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नैऋत्य रेल्वेने गोगटे सर्कलपासून तिसरे रेल्वेगेटपर्यंत काँग्रेस रोडच्या बाजूने संरक्षक भिंत उभारली होती. सिमेंटच्या पट्टय़ा वापरुन हि भिंत उभारण्यात आली आहे. परंतु कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे भिंत उभारल्यानंतर पहिल्याच वर्षी भिंतीचा काहि भाग कोसळला. काँग्रेस रोडला लागूनच ही भिंत असल्यामुळे ती कोसळल्यास रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या वाहनांना धोका पोहोचणार आहे.

काँग्रेस रोडच्या बाजूने असणार्‍या फुटपाथवर अनेक लहान विक्रेते साहित्य विक्री करतात. तर अनेक लहान मुले फुटपाथवरुन शाळेसाठी ये-जा करीत असतात. पावसाळय़ाच्या दिवसांत संरक्षक भिंतीचे अनेक खांब खचले असून ते केंव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. जर भिंत कोसळून मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वे विभाग घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नैऋत्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालून ज्या ठिकाणी संरक्षक भिंत खराब झाली आहे तेथे दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

कर्नाटक: तालुक्यातील रुग्णालयात भूलतज्ञांची कमतरता

Abhijeet Shinde

मिरजेतील डॉक्टराला 50 लाखांचा गंडा

Abhijeet Shinde

लडाखमध्ये होणार केंद्रीय विश्व विद्यालय : केंद्र सरकार

Rohan_P

कर्नाटक: राज्य सरकार रात्रीची संचारबंदी उठविण्याच्या तयारीत

Abhijeet Shinde

कर्नाटक: सिध्दरामय्यांकडून गोमांस आणि कोडवांवरील वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त

Abhijeet Shinde

इराणने भारताला फरजद-बी वायू प्रकल्पातून वगळले

datta jadhav
error: Content is protected !!