रायचूर-बाची राज्य महामार्गावर येणाऱ्या बेळगाव-सांबरा रस्त्यादरम्यान सहा पदरी किंवा चौपदरी रस्ता करण्यात येणार आहे या बांधकामासंदर्भात योजनेवर स्वतंत्रपणे चर्चा करून तातडीने मंजूर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. ते कर्नाटक विकास कार्यक्रम अर्थात केडीपीची पहिली तिमाही बैठक सुवर्ण विधान सौध येथे घेण्यात आली यावेळी बोलत होते.
सहा पदरी रस्त्यासाठी 112 कोटी तर चौपदरीकरणासाठी 84 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.