Tarun Bharat

बेल्जियमचा फुटबॉलपटू हेझार्ड निवृत्त

वृत्तसंस्था/ अल रेयान (कतार)

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत मानांकनात अग्रस्थानावर असलेल्या बेल्जियमचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. दरम्यान, बेल्जियम फुटबॉल संघाचा कर्णधार इडीन हेझार्डने बुधवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली.

प्रत्येक चार वर्षांनी होणाऱया विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियम संघाकडून मोठी अपेक्षा शौकिनांनी बाळगली होती. पण कतारच्या या स्पर्धेत बेल्जियम संघाने निकृष्ट कामगिरी करत शौकिनांना निराश केले. संघाच्या दर्जाहीन कामगिरीमुळे निराश झालेल्या 31 वषीय हेझार्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. कतारमधील सुरू असलेल्या फिफाच्या या स्पर्धेत प्राथमिक फेरीत बेल्जियमने कॅनडाचा पराभव केला. पण त्यानंतर त्यांना मोरोक्कोकडून पराभव पत्करावा लागला. बेल्जियमचा फ गटातील क्रोएशियाविरुद्धचा तिसरा सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने त्यांचे आव्हान समाप्त झाले.

बेल्जियमचा कर्णधार हेझार्डने 2008 साली आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने आपल्या 14 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीत 126 सामन्यात बेल्जियमचे प्रतिनिधित्व करताना 33 गोल नोंदविले. 2018 साली रशियात झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत हेझार्डच्या कामगिरीच्या जोरावर बेल्जियमने समाधानकारक कामगिरी केली होती. हेझार्डने आतापर्यंत दोनवेळा प्रिमियर लीग आणि युरोपा लीग स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिल्या आहेत. 2019 साली तो रियल माद्रिद संघात दाखल झाला. त्यानंतर त्याने रियल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीग आणि दोनवेळा ला लीगा फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळवून दिले.

Related Stories

के.श्रीकांत पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

‘सुप्रीमसी’वर शिक्कामोर्तब हेच मुंबई-चेन्नईचे लक्ष्य

Patil_p

विजयी प्रारंभ करण्यास भारतीय महिला उत्सुक

Amit Kulkarni

विराट, रोहितचे वनडेतील स्थान कायम

Patil_p

हैद्राबाद- मुंबई यांच्यात जेतेपदासाठी लढत

Patil_p