वार्ताहर /किणये
बेळगुंदी ग्राम पंचायतच्या उपाध्यक्षपदी रेहमान ताशीलदार यांनी बाजी मारली आहे. शुक्रवारी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्राम पंचायत उपाध्यक्ष पदासाठी रेहमान ताशीलदार, प्रताप सुतार व शीतल सुतार या तिघांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर शीतल सुतार यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे रेहमान ताशीलदार व प्रताप सुतार या दोघांमध्ये निवडणूक झाली.
या निवडणुकीमध्ये रेहमान ताशीलदार यांना 11 मते पडली तर प्रताप सुतार यांना 8 मते पडली. त्यामुळे तीन ग्राम पंचायत सदस्यांची अधिक मते घेऊन रेहमान ताशीलदार यांनी उपाध्यक्षपदी बाजी मारली आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र दनवाडकर, पीडीओ अश्विनी कुंदर या उपस्थित होत्या. बेळगुंदी ग्राम पंचायतीमध्ये एकूण 19 सदस्य असून बेळगुंदी, सोनोली व बोकनूर या तीन गावांचा या ग्राम पंचायतीमध्ये समावेश आहे. रेहमान ताशीलदार यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शक व समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्मयांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.