Tarun Bharat

फणसाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये आकाराने कोणते फळ मोठे असे विचारल्यास ‘फणस’ असंच सर्वांच्या तोंडून उत्तर येतं. पण फणस हा आरोग्यदायी आहे, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो. मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-६ आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते.

तर फणसाचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप- २ मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात असे फायदे फणस खाण्यामुळे होतात.

फणसामध्ये असणारे पोषक घटक
सध्या बाजारात फणस सर्वत्र मिळते.फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे. डॉक्टर देखील हे खाण्याचा सल्ला देतात. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. फणस खाल्याने डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्यामुळे फणसाचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे पाहुयात…

फणस खाल्याणे होणारे फायदे

फणसातील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.

फणसाची पाने स्वच्छ साफ करून सुकवल्यानंतर पानांचे चूर्ण तयार करा. त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. तर तोंड आल्यास फणसाची कच्ची पाने चावून थुंकल्याने तोंडाचे विकार कमी होतात.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित फणसाच्या पानांच्या रसाचे सेवन केल्यास त्यांना नक्की फायदा आहे. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा रस गुणकारी आहे.

फणसाच्या सालीपासून निघणारे दूध शरीराच्या सुजलेल्या किंवा दुखापत झलेल्या भागात लावल्यास आराम मिळतो. गुडघ्यांचे आजारही कमी होतात.

हिमोग्लोबिन कमी असलेल्यानी फणस खावा. कारण फणसात लोहाचे प्रमाण जास्त असते. यामुळे ऍनिमिया, अशक्तपणा व थकवा दूर होण्यास मदत होते.

दमा असलेल्या रूग्णांसाठी फणसाची मूळे फार गुणकारी असतात. फणसाच्या मुळांना उकळून, त्या पाण्याच्या सेवनाने दमा नियंत्रित राहण्यास मदत होतो.

जर तुम्ही थायरॉइडच्या समस्येचा सामना करत असाल, तर तुम्ही फणस सेवन करावे. फणसात कॉपर तत्व असतात, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीचा स्त्राव संतुलित राहतो.

तर फणस आपल्याला एका सेवनातून इतके पौष्टिक घटक आणि तत्व देतं जे आपल्याला विविध फळं आणि भाज्या खाल्ल्यानंतर मिळतात. ज्या प्रमाणे मांस खाल्ल्याने एकाचवेळी तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात तसेच केवळ फणस खाल्ल्यानेही तुमच्या शरीराला अनेक लाभ होतात आणि म्हणून फणसाला व्हेज मिट असेही म्हणतात.

Related Stories

जलोदुरनाशक मुद्रा

Omkar B

प्लाझ्मा थेरपीचा अंतरगात

Amit Kulkarni

ऑक्सिजन आणि आरोग्य

Omkar B

यात असतात कार्बोदकं… डाएट अँड न्यूट्रिशन

tarunbharat

वाढलेला मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी करा घरगुती उपाय

Archana Banage

मुलायम केसांसाठी कंडिशनर लावण्याची योग्य पद्दत

Kalyani Amanagi