ऑनलाईन टीम/तरुण भारत
शरीराला ताजे तवाणा ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित पाणी (Water) पिणे गरजेचे आहे. यासाठी नियमित ८ ते १० ग्लास पाणी प्या असा सल्ला नेहमी दिला जातो. पाणी पिण्याने शरीर हायड्रेट तर राहतेच, त्यासोबत अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत मिळते. असे अनेकजण म्हणतात. तर सकाळी उठल्यावर ब्रश कराच्या आधी पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते असे म्हटलं जातं. खरंच ब्रश (Brush) करण्याआधी पाणी पिणे योग्य आहे का याचा शरीराला नेमका काय फायदा होतो हे जाणून घेऊया.
पचनक्रिया सुरळीत होते.
सकाळी उठल्यावर पाणी पिण्याने आपली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. यासाठी झोपण्यापूर्वी ब्रश करुन झोपा. रात्रभर तुमचे शरीर पाण्याच्या मदतीने इतर इंद्रियांसाठी काम करत असते. कधी-कधी शरीरातील पाणी कमी झाले की तुम्हाला तहाण लागल्यासारखे जाणवते.आपण दिवसभर पाणी पितो मात्र रात्री सतत जाग येईल या भितीने पाणी कमी पितो. त्यामुळे दिवसाची सुरवात करण्याआधी पाणी भरपूर प्या. याचा फायदा पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
अति तेलकट पदार्थांचे सेवन ठरू शकते हानिकारक
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी होतो फायदा
अनेकांच्या तोंडाचा खूप वास येत असतो. अशा लोकांनी सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिल्याने श्वसनाच्या दुर्गंधीच्या सम्यसेपासून सुटका मिळवता येते. याशिवाय तोंडात लाळेची कमतरता पडली तर त्याठिकाणी जीवाणू तयार होतात. तोंड कोरडे पडते आणि वास यायला लागतो. यासाठी सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास या समस्येपासून सुटका मिळेल.पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, तोंडात व्रण येणे, कच्ची ढेकर येणे इ. देखील दुर होण्यास मदत होतं असते.
त्वचा, केस चांगले होतात
ब्रश करण्यापूर्वी पाणी पिल्याने तोंड जंतूमुक्त होते. याचा फायदा स्किनला आणि केसांसाठी होतो. तुम्हाला जर सर्दीचा त्रास होत असेल तर सकाळी पाणी प्या त्रास कमी होईल. याशिवाय शुगर , हाय ब्लेडप्रेशरचा त्रास असेल तर या व्याधीपासून होणारा इतर त्रास हळूहळू कमी होण्यास मदत होते. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.