Tarun Bharat

Benefits Of Hugs : मिठी मारण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

अर्चना बनगे, प्रतिनिधी
Benefits Of Hugs : मुन्ना भाई एम.बी.बी एस या चित्रपटानंतर जादू की झप्पी हा डायलॉग खूप फेमस झाला. एक झप्पी दिली की टेशन्स कायब असा मेसेज त्यावेळी पुढे आला. खरतर जादू की झप्पी ( मिठी मारणे ) ही एक अशी सवय आहे ज्यामुळे मनाला समाधान वाटते. जेव्हा आपण खूप दुःखी असतो,खूप आनंदी असतो अशा वेळी आपल्या प्रियजनांना जादू की झप्पी देतो तेव्हा आपल्याला खूप रिलीफ होतं. खरंतर मिठी ही एक सुखदायक भावना आहे. तसेच मिठी मारल्याने मन पूर्णपणे शांत होते हे आता एका अभ्यासानुसार सिध्द झाले आहे. मिठी मारण्याचा आपल्या हार्मोनशी काही संबंध आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मिठी मारल्याने हे तीन हार्मोन्स शरीरातून बाहेर पडतात.

डोपामाइन: डोपामाइन एक रासायनिक संदेशवाहक आहे जे मेंदूला अनेक चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा मोठ्या प्रमाणात डोपामाइन रसायन जबरदस्तीने सोडले जाते तेव्हा आनंद आणि विश्रांती सारख्या अनेक सकारात्मक भावना उद्भवतात. त्यामुळे व्यक्तीला आत्मसमाधान मिळते.

सेरोटोनिन: सेरोटोनिन आपल्या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ओळखले जाते. हे चांगल्या मूडला प्रोत्साहन देते आणि एकाकीपणाची भावना कमी करते.

ऑक्सिटोसिन: याला प्रेम संप्रेरक म्हणून ओळखले जाते. जे आपला तणाव कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. हा हार्मोन आपले हृदय चांगले राखतो.

मिठी मारण्याचे हे आश्चर्यकारक फायदे आहेत

तणाव कमी करा: संशोधनात असे दिसून आले आहे की मिठी मारल्याने तणाव कमी होतो आणि तुमचा मूड हळूहळू सुधारतो.

BP नियंत्रित करा: नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, मिठी मारल्याने हृदयाचे ठोके सामान्य होतात.तर एका अभ्यासानुसार, 10 मिनिटे हात धरून ठेवल्यास आणि 20 सेकंद मिठी मारल्याने तुमच्या रक्तदाबाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते असे सिध्द झाले आहे.

भीती कमी करते: जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने तुमची भीतीही कमी होते. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी मिठी मारणे देखील चांगले आहे.

आत्मविश्वास वाढतो: ज्या वेळी तुम्हाला खूप आत्मविश्वासाची गरज आहे आणि तुमचा आत्मविश्वास कमी होत आहे अस वाटतं तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारली पाहिजे, आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

Related Stories

थंडीत अशी घ्या त्वचेची काळजी

Kalyani Amanagi

ट्रेडमिलवर धावताना…

Omkar B

ओळखा कातडीचा कर्करोग

Omkar B

ई व्हिटॅमिन कशासाठी ?

Omkar B

ऑक्सीमीटर आणि आपण

Omkar B

कोरोना काळात उपयुक्त गॅजेट

Omkar B